शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: अभ्यासाचा तणाव असह्य, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:20 IST

Jalgaon: रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपलेले असताना तन्मय गजेंद्र पाटील या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

- विजयकुमार सैतवालजळगाव : रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपलेले असताना तन्मय गजेंद्र पाटील (१४, रा. गणेश कॉलनी, जळगाव) या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून ठेवत जीवन संपविले. अभ्यासाच्या ताणावातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. 

शहरातील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला तन्मय हा गणेश कॉलनी परिसरात आई, वडील ॲड. गजेंद्र पाटील आणि मोठा भाऊ ओम यांच्यासोबत राहत होता.  गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. वडील गजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता त्यांना तन्मय जागेवर दिसला नाही. त्यामुळे त्यांनी वरच्या खोलीत जावून पाहिले असता मुलाने गळफास छताला गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. मुलाला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष सोनवणे करीत आहेत.  मयताच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थी