शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मोठा अपघात; गव्हाने भरलेला भरधाव ट्रक गेट तोडून रेल्वेवर आदळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:29 IST

बोदवडनजीक पहाटेची घटना, जिवीत हानी टळली

गोपाल व्यास

बोदवड (जि.जळगाव) : धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रेल्वे गेट तोडून मुंबई - अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला. यात कुठलिही जिवित हानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता बोदवड रेल्वेस्थानकापासून  ५०० मीटर अंतरावर घडली. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (क्.१२१११)  ही गाडी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात होती. त्याचवेळी बंद असलेले रेल्वेगेट तोडून एक ट्रक रेल्वे मार्गात घुसला आणि रेल्वे इंजिनवर जाऊन आदळला. इकडे एक्सप्रेसची गती कमी असल्याने चालकाने ब्रेक लावून गाडी थांबवली. तर ट्रक इंजिनवर धडकताच ट्रकचालक उडी घेत पसार झाला. एक्सप्रेस चालकाने तात्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली.  मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरुन खाली पडले.

अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

बोदवडनजीक झालेल्या अपघातामुळे  रेल्वेची हाय टेन्शन वायर तुटली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अमरावती एक्सप्रेस त्याठिकाणीच थांबविण्यात आली आहे. डाऊन मार्गावरील महाराष्ट्र एक्सप्रेस, भुसावळ - बडनेरा मेमू आणि शालिमार एक्सप्रेस या गाड्या तसेच अप मार्गावरील चेन्नई- अहमदाबाद एक्सप्रेस, वर्धा-  भुसावळ या गाड्या ३ते ४ तास उशिराने धावत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे