रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहिम
By Admin | Updated: April 27, 2017 13:50 IST2017-04-27T13:50:41+5:302017-04-27T13:50:41+5:30
‘जळगाव फस्र्ट’ या संस्थेतर्फे शुक्रवार, 28 रोजी अक्षय्य तृतीयेपासून शहरात ठिकठिकाणी सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे.

रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहिम
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 - राज्य शासनाने जळगावातील दारु व्यावसायिकांना फायदा व्हावा यासाठी 6 रस्त्यांची मालकी बदलली. या निर्णयाच्या विरोधात ‘जळगाव फस्र्ट’ या संस्थेतर्फे शुक्रवार, 28 रोजी अक्षय्य तृतीयेपासून शहरात ठिकठिकाणी सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जळगावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, रस्त्यांची मालकी बदलल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 26 एप्रिल रोजी राज्य शासनाला फटकारले होते. आता याप्रकरणी 4 मे रोजी सुनावणी होणार आहे.