शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: कारवाई करणाऱ्या पोलिसाला ढकलून देत वाळूचे ट्रॅक्टर पळविले, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

By विजय.सैतवाल | Updated: July 21, 2023 16:13 IST

Jalgaon: अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून ते पोलिस ठाण्यात नेत असताना पोलिस नाईक प्रशांत शांताराम पाटील यांना ट्रॅक्टरच्या खाली ढकलून देत व शिवीगाळ करीत हे ट्रॅक्टर पळनून नेले.

- विजयकुमार सैतवालजळगाव - अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून ते पोलिस ठाण्यात नेत असताना पोलिस नाईक प्रशांत शांताराम पाटील यांना ट्रॅक्टरच्या खाली ढकलून देत व शिवीगाळ करीत हे ट्रॅक्टर पळनून नेले. ही घटना २० जुलै रोजी घडली.  या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २० जुलै रोजी रात्री सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

खोटे नगर परिसरातील समर्थ कॉलनी ते खोटेनगर थांब्यादरम्यान वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिस नाईक प्रशांत पाटील यांनी पकडले. त्यात एक ब्रास वाळू होती. हे ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात आणत असताना ट्रॅक्टर चालक देवानंद (पूर्ण नाव समजू शकले नाही), मालक अर्जुन पाटील, मोहसीन खान व इतर तीन ते चार जणांनी पोलिस नाईक पाटील यांना अरेरावी करीत त्यांना ट्रॅक्टरच्या खाली रस्त्यावर ढकलून दिले. तसेच त्यांना शिवीगाळ करीत एक ब्रास वाळू असलेले विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली पळवून घेऊन गेले. 

या प्रकरणी पोलिस नाईक पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील सहा ते सात जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.  दरम्यान, अवैध वाळू वाहतूक सुरूच असून आता तर पोलिसाला ढकलून देण्यापर्यंत वाळू वाहतूकदारांची हिम्मत वाढली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव