जळगाव रेल्वे स्टेशनवर देशी दारुसह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 12:15 IST2017-09-10T12:12:33+5:302017-09-10T12:15:09+5:30
449 बाटल्या जप्त : विक्री आधीच पकडले

जळगाव रेल्वे स्टेशनवर देशी दारुसह एकास अटक
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - रेल्वे स्टेशनवर देशी दारुच्या 11 हजार 674 रुपयाच्या मालासह शनिवारी पहाटे पाच वाजता रेल्वे पोलिसांनी एकास अटक केली. ईश्वर बन्सीलाल चौधरी (वय- 32, रा़जानकीनगर, जळगाव) असे संशयिताचे नाव आह़े हा माल विदर्भात विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती मिळाली.
रेल्वे पोलीस अनिंद्र नगराळे यांना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक 3 वर एक संशयित देशी दारुचा माल विक्रीसाठी रेल्वेने विदर्भात घेवून जात असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार त्यांनी चिंतामण आहेर, रवींद्र ठाकूर, योगेश अडकने या सहका:यांसह घटनास्थळ गाठल़े
सहका:यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळील एक पिशवी व बॅगेमध्ये देशी दारुच्या 90 मिलीच्या 449 बाटल्या असा एकूण 11 हजार 674 रुपयांचा माल आढळून आला़ त्यासअटक करुन त्याच्याविरोधात भुसावळ रेल्वे पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.