जळगाव पोलिसांच्या हातावर तुरी देणा-या आरोपीची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 17:29 IST2017-11-26T17:24:59+5:302017-11-26T17:29:51+5:30
सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण व पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळणाºया राजू भिकू पवार (वय ३२ रा. महागाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ) याची रविवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. राजू पवार याने २५ हजार रुपये दिले नाहीत म्हणून गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.

जळगाव पोलिसांच्या हातावर तुरी देणा-या आरोपीची कारागृहात रवानगी
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२६ : सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण व पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळणाºया राजू भिकू पवार (वय ३२ रा. महागाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ) याची रविवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. राजू पवार याने २५ हजार रुपये दिले नाहीत म्हणून गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी लागलीच त्याचा शोध घेऊन बालकाची सुखरुप सुटका केली होती. बालकाला पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस पवार याला जळगाव घेऊन येत असताना त्याने लघवीच्या कारणाने पोलीस वाहन थांबविले होते व बाप रे.. केवढा मोठा साप असे म्हणत पोलिसांचे लक्ष विचलित करुन तेथून पळ काढला होता. त्यादिवसापासून तो फरार होता. शनिवारी त्याला त्याच्या मुळ गावातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. २५ हजार रुपये रोख सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याने ही रक्कम भरली नाही, त्यामुळे न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.