शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कोविडमध्ये अनुकंपावर नोकरीत सामावून घेणारे जळगाव पोलीस राज्यात पहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 20:16 IST

६८ जणांना दिले नियुक्तीपत्र : अवघ्या सहा दिवसात राबविली प्रक्रिया

जळगाव : कर्तव्यावर असताना कोरोनामुळे असो की इतर घटनांमध्ये जीव जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर तात्काळ पोलीस सेवेत सामावून घेण्यात जळगाव पोलीस दल राज्यात पहिले ठरले आहे, अवघ्या सहा दिवसात ही प्रक्रिया पार पाडण्यात आली याचा आपल्याला गर्व असल्याची भावना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी व्यक्त केली. दिघावकर यांच्याहस्ते बुधवारी ६८ पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोनामुळे सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. त्यांच्यातील तीन पाल्यांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. बाकीच्या पाल्यांचे वय अपूर्ण असल्याने त्यांनाही पुढच्या टप्प्यात सामावून घेतले जाणार आहे. त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांच्या ६५ पाल्यांना सेवेत घेण्यात आले असून त्यात ५२ पुरुष व १६ महिलांचा समावेश आहे. अनुकंपावर असल्याने या उमेदवारांची फक्त शारीरीक चाचणी घेण्यात आली.अनुकंपाचीही एकही जागा रिक्त नाहीपोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, २०१९ च्या भरतीच्या अनुषंगाने २२ टक्के जागा भरण्याची मुभा होती, त्याचा आकडा ३५ होता तर २०२० मध्ये रिक्त जागेनुसार ४१ जागांना मान्यता मिळाली. त्यात ३९ उमेदवार पात्र ठरले. अनुकंपावरील सर्व उमेदवारांना नोकरीत सामावून घेतल्यामुळे आता एकही जागा शिल्लक राहिलेली नाही. ज्या आहेत, त्यांची वयोमर्यादा पूर्ण झाली की त्यांनाही सामावून घेण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले. या कामासाठी सलग सहा दिवस मेहनत घेणारे उपअधीक्षक (गृह) डी.एम.पाटील, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे व त्यांच्या सहकार्यांचे दिघावकर व डॉ.मुंढे यांनी कौतूक केले.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव