शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

गाडीच्या टपावर बसून भाईगिरी! पोलिसांनी 'त्याची' मस्ती जिरवली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 00:10 IST

जळगावच्या स्वयंघोषित डॉनला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

प्रशांत भदाणे, जळगाव- शहरातील एका तरुणाला मित्रांसोबत गाडीच्या टपावर बसून भाईगिरी करणं चांगलंच भोवलंय. भाईगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. त्यामुळे हात जोडून माफी मागायची वेळ त्या स्वयंघोषित डॉनवर आली.

विठ्ठल पाटील असं भाईगिरी करणाऱ्या तरुणाचं नाव असून, तो जळगाव शहरात असलेल्या अयोध्या नगरातील रहिवासी आहे. हा सारा प्रकार जळगावातील आकाशवाणी चौकात 16 मे रोजी रात्री साडेदहा वाजता घडलाय. विठ्ठल पाटील याने आपल्या मित्राच्या बोलेरो गाडीच्या टपावर बसून भाईगिरी केली. आपण जळगाव शहराचे मन्या सुर्वे डॉन असल्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांनी मस्ती जिरवल्यानंतर विठ्ठल पाटीलने हात जोडून माफी मागितली.

समाजात दहशत निर्माण होईल, अशा पद्धतीचं कोणत्याही स्वरूपाचं कृत्य करू नये, असं आवाहन पोलिसांनी या घटनेच्या निमित्ताने नागरिकांना केलंय. जर कोणी दहशत निर्माण होईल असं कृत्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय.

टॅग्स :Jalgaonजळगाव