शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनात एकीने पती तर दुसऱ्याने पत्नी गमावली; अखेर 'त्यांनी' साताजन्माची लग्नगाठ बांधली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:32 IST

जुन्या रुढी, परंपरा बाजुला सारत समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्यालाही वैयक्तिक आयुष्य आहे, जगण्याचा अधिकार आहे या उदात्त भावनेने कुटूंब, नातेवाईक व वहिणी यांची समजूत घातली अन‌् दुसरा विवाह घडवून आणला.

सुनील पाटील

जळगाव - संसार अतिशय सुखात सुरू असतानाच त्याला कोरोनाची दृष्ट लागली. त्यात सुमित्रा यांचा पती तर ऋषीकेश यांची पत्नी हिरावली. त्यामुळे दोघांच्या संसारातले एक चाक निखळले. दोघांनाही मुलं आहेत. स्वत:सह मुलांचे आयुष्य व भवितव्याचा प्रश्न होताच, मात्र समाज दुसऱ्या लग्नाला मान्यता देणार नाही, किंबहूना सुमित्रा यांचीही विवाहाची इच्छा नव्हतीच. मात्र सुमित्रा यांचा दीर नितीन हिरालाल पाटील यांनी पुढाकार घेत जुन्या रुढी, परंपरा बाजुला सारत समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्यालाही वैयक्तिक आयुष्य आहे, जगण्याचा अधिकार आहे या उदात्त भावनेने कुटूंब, नातेवाईक व वहिणी यांची समजूत घातली अन‌् दुसरा विवाह घडवून आणला.

शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे मुळ गाव तर सामनेर, ता.पाचोरा मामाचे गाव असलेल्या नितीन पाटील यांचे मोठे बंधू विनोद पाटील यांचे कोरोनात निधन झाले. पतीच्या निधनाने पाच वर्षाची मुलगी व सुमित्रा (माहेर मामलदे, ता.चोपडा) यांच्यावर मोठे संकट कोसळले. पुढील आयुष्य कसे जगायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. अशातच कनाशी, ता.भडगाव येथील ऋषीकेश यांच्या पत्नी शिक्षिका अनघा यांचेही कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती नितीन यांना समजली. त्यांनी ऋषीकेश व त्यांच्या नातलगांशी संपर्क केला. त्यांना २२ वर्षाचा मुलगा आहे. इकडे वहिनी व कुटूंबाची समजूत घातली. 

जुन्या रुढी, परंपरांना छेद देत दोन्ही परिवार राजी झाले. ऋषीकेश यांनी पाच वर्षाच्या मुलीसह सुमित्रा यांचा स्वीकार करण्यास होकार दिला अन‌् दोन्ही परिवाराच्या संमतीने २७ मे रोजी अंबरनाथ येथे हा पुनर्विवाह पार पडला. दोन्ही पाटील कुटूंबात आज आनंदाचे वातावरण आहे. या विवाह सोहळ्यास जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव