जळगाव मनपातील अधिकारी, कर्मचा:यांची लवकरच खांदेपालट
By Admin | Updated: April 2, 2017 11:54 IST2017-04-02T11:54:53+5:302017-04-02T11:54:53+5:30
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्तीला असलेल्या जळाव महापालिकेतील अधिकारी व कर्मचा:यांची लवकरच खांदेपालट होणार आहे.

जळगाव मनपातील अधिकारी, कर्मचा:यांची लवकरच खांदेपालट
जळगाव,दि.2- महापालिकेच्या सर्व विभागातील खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचा:यांची खांदेपालट करण्यात येणार आह़े यासाठी आयुक्त जीवन सोनवणे हे सफाई कर्मचारी वगळता मनपाचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचा:यांची मुलाखती घेण्यात असून कर्मचारी कामाच्या मूल्यमापनानुसार ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े
महापालिकेतील सर्व विभागांतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचा:यांच्या बदल्या या आठवडय़ात होणार आहेत. ही प्रक्रिया राबविण्यापूर्वी आयुक्त सोनवणे महापालिकेतील सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी काय काम करतात याची माहिती घेणार आहे. ही ओळख परेड 5 ते 7 एप्रिल दरम्यान चार दिवस दुपारी तीन ते चार या वेळेत आयुक्तांच्या दालनात घेतली जाणार आहे.
यावेळी आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त डॉ.लक्ष्मीकांत कहार, आस्थापना अधिक्षक राजेंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत. महापौर, उपमहापौर दालन, नगररचना विभाग, आयुक्त, उपायुक्त दालन, आंतरलेखा विभाग, अभिलेखा, बालवाडी विभाग, भांडार विभाग, वाहन व्यवस्था, नगरसचिव, विधी शाखा, आस्थापना, बांधकाम, आरोग्य तर पर्यावरण, प्रकल्प, पाणी पुरवठा आदी विभागातील कर्मचारी, अधिकारी यांची ओळख परेड घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.