शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जळगाव मनपा निवडणूक : ई-गव्हर्नन्स, पारदर्शक कारभार व गतिमान प्रशासनावर राहणार शिवसेनेचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:15 IST

विकासनामा जाहीर

ठळक मुद्देदहा हजार कुटूंबाकडून जाणून घेण्यात आली मते; सुरेशदादा जैन यांची माहितीउद्योजकांचा जळगावकडे कल वाढत आहे

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेने मंगळवारी आपला विकासनामा प्रसिध्द केला. गेल्या दोन वर्षांपासून शहराचे आॅडीट करून, शहरातील १० हजार कुटुंबाकडे जावून व सर्वेक्षण करून शिवसेनेने आपला विकासनामा तयार केला आहे. ई-गव्हर्नन्स, पारदर्शक कारभार व गतिमान प्रशासनावर आपला भर राहणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रपरिषदेत दिली.खान्देश कॉम्प्लेक्समधील कार्यालयात मंगळवारी पत्रपरिषद झाली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, इंदिराताई पाटील, माजी महापौर रमेशदादा जैन, नितीन लढ्ढा, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.उद्योजकांचा जळगावकडे कल वाढत आहेशहरात नवीन उद्योगांसाठी स्थिती निर्माण होत आहे. मुंबई, पुण्याचा विकास झाल्यानंतर नाशिक व औरंगाबादकडेच उद्योजकांचा कल होता. मात्र, आता उद्योजकांचा कल जळगावकडे देखील वाढत असल्याची माहिती सुरेशदादा जैन यांनी दिली. एमआयडीसीचे धोरण हे शासन ठरवत असून महानगरपालिकेकडून एमआयडीसीमधील इतर सुविधा पुरविण्यावर भर दिला जात असल्याचेही सुरेशदादा म्हणाले.गेल्या पाच वर्षांत जनतेवर कोणतेही कर लादले नाहीगेल्या पाच वर्षात जळगावकरांना सुविधा देण्यासोबतच इतर बोजा नागरिकांवर पडणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे गेल्या पाच वर्षात कुठलीही घरपट्टी किंवा पाणीपट्टी यामध्ये कु ठलीही करवाढ केली नसल्याची माहिती सुरेशदादा जैन यांनी दिली.वाघूर योजनेच्या माध्यमातून जळगावकरांना मुबलक पाणी मिळत असून,अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेनंतर प्रत्येक जळगावकराला उच्च दाबाने पाणी मिळणार असल्याची माहितीही सुरेशदादा जैन यांनी दिली. तसेच सध्या अमृत योजनेची कामे शहरात सुरु असून लवकरच मलनिस्सारण योजनेलाही प्रारंभ होणार आहे.यासाठी रस्त्यांचे खोदकाम देखील केले जात आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे या योजना पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांचा कामांना सुरुवात केली जाणार आहे.मनपाच्या उत्पन्नांचे स्त्रोत कमी झालेमनपा प्रशासनावर हुडको, जिल्हा बॅँकेचे कर्जामुळे मनपाला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतमधून काही भाग हा कर्जाच्या हप्ते फेडण्यास जातो. २००१ पर्यंत कर्जाचे हप्ते नियमित फेडले जात होते. मात्र, त्यानंतर हप्ते रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज वाढत गेले. याला कोण जबाबदार हे आता सांगण्याची वेळ नाही. मात्र, अशा परिस्थितीत देखील जळगावकरांना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले.एलबीटी, जीएसटी मनपा प्रशासनाला योग्यरितीने राबविता न आल्याने मनपाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्याचेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.इच्छापुर्ती गणेशाला ‘विकासनामा’ अर्पणशिवसेनेचा विकासनामा प्रसिध्द करण्याआधी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते विकासनामा इच्छापुर्ती गणेश मंदिरातील गणेशाला अर्पण करण्यात आला. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील, माजी नगरसेवक श्याम कोगटा, मंदिराचे पुरोहित प्रमोद जोशी आदी उपस्थित होते.या कामांना देणार प्राधान्यशिवसेनेने जाहीर केलेल्या विकासनामामध्ये रस्ते विकासावर भर देण्यात आला आहे.यासह समांतर रस्ते, उड्डाणपूल, पादचारी मार्ग, चौक सुशोभिकरण, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता, घरपोहच औषध सेवा, सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल, सागर पार्क मैदानावर जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, घनकचरा प्रकल्प, मेहरूण तलाव सुशोभिकरण, घरकुल, शैक्षणिक सुविधा व विस्तार, व्यापारी गाळे कराराचे नुतनीकरण, मनपा मालमत्तेचे नियोजन व मुल्यांकन यावर शिवसेनेकडून भर दिला जाणार आहे.सर्व विभाग आॅनलाईन केल्यास पारदर्शक कारभार होईलसध्याचे युग हे डिजीटल युग असून सर्व आॅनलाईन व्यवहारावरच नागरिकांचा भर आहे. त्यामुळे भविष्यात महानगरपालिकेचे सर्व कार्य हे आॅनलाईन पध्दतीने, मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने ते नागरिकांना वापरता येतील यावर भर दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांचा थेट कर्मचाºयांशी संपर्क येणार नाही. यामुळे पारदर्शक कारभार राहणार असल्याची माहिती सुरेशदादा व रमेशदादा जैन यांनी दिली.आॅनलाईन कारभारामुळे प्रशासन देखील गतिमान होईल. तसेच निविदा प्रक्रिया आॅनलाईन करून याची सर्व माहिती संकेतस्थळावर देवून ही नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच शहरात वाय-फाय सुविधा देण्यावर देखील भर दिला जाणार असल्याची माहिती महापौर रमेशदादा जैन यांनी दिली.वाढीव हद्दीतील भागात विकासकामांना प्राधान्य देणारसुरेशदादा जैन म्हणाले की, शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असून, वाढीव भागातील नागरिकांना ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. वाढीव भागातील नागरिकांसाठी अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. वाढीव भागातील नागरिकांसाठी उद्यान, रस्ते, गटारी अशा सुविधा पूर्ण करण्यावर शिवसेनेचा भर राहणार आहे.मनपा व गाळेधारकांचे हित जोपासून गाळेप्रश्न मार्गी लावणारमनपा मालकीच्या २० मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न शहराच्या दृष्टीने महत्वाचा असून, गाळे कराराची मुदत ही २०१२ मध्ये संपली आहे. गाळ्यांच्या भाडे कराराचे नूतनीकरण करुन नव्याने भाडे आकारणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात मनपाकडून नुतनीकरणासंदर्भात अनेक करार करण्यात आले. मात्र, काही दुकानदार आणि इतर घटकांनी यामध्ये हस्तक्षेप करुन नूतनीकरण होवू दिले नाही. सध्या सर्वच गाळेधारक मनपाचे थकबाकीदार ठरले आहेत. शासनाने मनपा अधिनियमात बदल केला असला तरी त्याचा लाभ जळगावच्या गाळेधारकांना होईल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र, शासनाचे निर्देश व न्यायालयाच्या आदेशानुसार मनपा व गाळेधारकांचेही हित जोपासून हा प्रश्न मार्गी लावण्यावर शिवसेनेचा भर राहणार असल्याची माहिती सुरेशदादा जैन यांनी दिली.विकासासाठी अडथळ्यांची शर्यत कमी व्हावी यासाठीच युतीचा प्रस्तावप्रत्येक निवडणुकीत एकमेकांचा विरोध, आरोप-प्रत्याराप हे होतच असतात. मात्र, निवडणुकीनंतर विरोध न करता शहराचा विकास कसा होईल यावर प्रत्येक राजकीय पक्षाने भर द्यायला हवे. मात्र, तसे झाले नाही. २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला त्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागली. शहराच्या विकासासाठी येणाºया अडथळ्यांची शर्यत कमी व्हावी यासाठीच भाजपाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.विरोधासाठी विरोध होवू नये , कटुता दुर व्हावी यासाठी आम्ही युतीसाठी प्रयत्न केले मात्र, त्यात यश मिळाले नाही असेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले. तसेच भविष्यात शिवसेनेलाच बहुमत मिळणार आहे. शहराचा विकास हाच शिवसेनेसाठी महत्वाचा राहणार असून, निवडणुकीनंतर योग्य निर्णय घेण्यात येईल असेही सुरेशदादा जैन म्हणाले.मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा...आरक्षणासंदर्भात जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची होती. तीच भूमिका माझी देखील आहे. मराठा समाजातील ८० टक्के समाजबांधवांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आर्थिक निकषावर आरक्षण दिल्यास या समाजबांधवांसह इतर समाजातील नागरिक की ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकटआहे. त्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळू शकेल. मराठा समाजबांधवांच्या आंदोलनाला व त्यांच्या मागणीला नेहमीच पाठींबा असल्याचेही सुरेशदादा जैन म्हणाले.काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजलीशिवसेनेचा विकासनामा प्रसिध्द करण्याआधी सर्व पदाधिकारी व उमेदवारांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठी आपले प्राण दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJalgaonजळगाव