शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

जळगाव मनपा निवडणूक : खान्देश विकास आघाडी व भाजपाच्या युतीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:57 IST

मुंबईत झाली बैठक

ठळक मुद्देयुतीबाबत ‘वर्षा’वर २० मिनीटे सविस्तर चर्चाभाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये मात्र नाराजी

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी खान्देश विकास आघाडी व भाजपा यांच्यातील युतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली.महानगरपालिकेत शहराच्या विकासाच्या मुद्यावर भाजपा व खान्देश विकास आघाडीमध्ये युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे दोन्हीही इच्छुक होते.याबाबत मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांपूर्वीच सुरेशदादांसोबत झालेल्या चर्चेत युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच गुरुवारी सकाळी ८.३० वाजता सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंदूलाल पटेल व मनपा सभागृह नेते नितीन लढ्ढा हे देखील उपस्थित होते.विमान दुर्घटनेमुळे सायंकाळची बैठक रद्दसकाळी मुख्यमंत्री व सुरेशदादा जैन यांची २० मिनीटे बैठक झाल्यानंतर सायंकाळी देखील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार होती. मात्र, दुपारी घाटकोपर येथे झालेल्या विमान दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी होणारी बैठक रद्द केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.जागावाटपाचा निर्णय सुरेशदादा व महाजन घेणारमुख्यमंत्र्यांनी खाविआ व भाजपाच्या युतीबाबत सकारात्मक चर्चा केल्यानंतर जागावाटपाचा निर्णय हा सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांनीच स्थानिक पातळीवर चर्चा करून घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वीच जागावाटपाबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.युतीबाबत ‘वर्षा’वर २० मिनीटे सविस्तर चर्चासूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांची मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी रात्रीच बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्र्याची तब्येत बरी नसल्याने ही बैठक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजता ही बैठक घेण्याचे निश्चित झाले. गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरेशदादा जैन, गिरीश महाजन, चंदूलाल पटेल व नितीन लढ्ढा हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर पोहचले. सकाळी ८.३० वाजता बैठकीला सुरुवात झाली. सुमारे २० मिनीटे चाललेल्या या बैठकीत युतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक होते.सुरेशदादांनी उध्दव ठाकरे यांचीही घेतली भेटमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुरेशदादा जैन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सकाळी ११.३० वाजता ‘मातोश्री’वर भेट घेतली. या बैठकीत मनपा निवडणूक तसेच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेबाबतची माहिती सुरेशदादा यांनी उध्दव ठाकरे यांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये मात्र नाराजीमुंबईत युतीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार चंदुलाल पटेल हे उपस्थित होते. मात्र, या बैठकीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार सुरेश भोळे यांना डावलल्यामुळे भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव