शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
4
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
5
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
6
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
7
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
8
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
9
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
10
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
11
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
12
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
13
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
14
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
15
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
16
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
17
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
18
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
19
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
20
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेच्या पुरस्कृत विरुद्ध अधिकृत उमेदवारामध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 12:53 IST

प्रभाग ७ ड व प्रभाग २ ब मध्ये रंगणार लढत

ठळक मुद्देदोन्ही उमेदवारांची बंडखोरी शिवसेना पुरस्कृत व अधिकृत अशी लढत

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेने ७ अपक्षांना पाठिंबा देत पुरस्कृत केले आहे. त्यात प्रभाग क्रमांक ७ ड व प्रभाग २ ब मध्ये शिवसेनेचे दोन अधिकृत उमेदवार असताना, माघारीची मुदत संपल्यानंतर दोन अपक्ष उमेदवारांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. मात्र, या प्रभागातील अधिकृत उमेदवारांनी जाहीर माघार घेण्यास नकार दिल्यामुळे आता शिवसेना पुरस्कृत व अधिकृत अशी लढत रंगणार आहे.शिवसेनेने सुरुवातीला ७५ जागांवर आपले अधिकृत उमेदवार उभे केले होते. मात्र, छाननी दरम्यान लिना पवार, गणेश सोनवणे, जिजाबाई भापसे यांच्या एबी फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास राज्य निवडणूक आयोगाने नकार दिला. तसेच लिना पवार यांचा प्रभाग ११ क मधील पक्षासह अपक्ष उमेदवार भरलेला अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांनी प्रभाग ११ ब मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली.ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे प्रभाग ११ मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार हर्षाली वराडे यांना ऐनवेळी माघार घेण्याचा सूचना पक्षाने दिल्यानंतर त्यांनी लागलीच पक्षादेश मानत माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने प्रभाग ११ ब मधून लिना पवार तर ११ क मधून अनिता सोनवणे या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले. तर १७ ड मधून शिवसेनेचे गजानन देशमुख यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागेवर हर्षल मावळे यांना पक्षाने पुरस्कृत केले आहे.अक्षय सोनवणे व योगेश पाटील रिंगणातखाविआच्या नगरसेविका हर्षा सांगोरे यांचे पती अमोल सांगोरे यांनी प्रभाग २ ब मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. तर भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान नगरसेविका जयश्री पाटील यांनी प्रभाग ७ ड मधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.माघारी आधीच या दोन्ही उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या दोन्ही प्रभागातील अधिकृत उमेदवार अक्षय सोनवणे व योगेश पाटील यांना माघार घेण्याचे आदेश दिले. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी पक्षादेश नाकारत पक्षाच्या चिन्हावरुन प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे प्रभाग २ ब मध्ये शिवसेना पुरस्कृत अमोल सांगारे व अधिकृत अक्षय सोनवणे तर प्रभाग ७ ड मध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार जयश्री पाटील व योगेश पाटील यांच्यात लढत रंगणार आहे.योगेश पाटील यांच्या पॅम्प्लेटवर सुरेशदादांचे छायाचित्र नाहीप्रभाग ७ ड मधील उमेदवार योगेश पाटील यांनी शिवसेनेच्या चिन्हावरच प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी मतदारांना वितरीत करण्यासाठीच्या पॅम्प्लेटवर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेचे जिल्हा संघटक हभप ज्ञानेश्वर जळकेकर यांचे छायाचित्र आहे मात्र माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे छायाचित्र नाही. तर अक्षय सोनवणे यांनी देखील शिवसेनेच्या चिन्हावरच प्रचाराला सुरुवात केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव