शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
3
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
4
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
5
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
6
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
7
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
8
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
9
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
10
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
11
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
12
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
13
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
14
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
16
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
17
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
20
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

‘अमृत’चे काम वेळापत्रकानुसार होत नसल्याचा जळगाव मनपाचा मक्तेदारावर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:46 IST

मक्तेदार जैन इरिगेशनला मनपाचे पत्र

जळगाव : अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत कामाचे मक्तेदार जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर्फे स्वत:च सादर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसारही काम होत नसल्याचा ठपका मनपाने ठेवला आहे. ‘अमृत’च्या कामाच्या वेगात सात दिवसात सुधारणा न झाल्यास, मक्तेदार जैन कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा ईशाराही मनपाने पत्राद्वारे दिला आहे.‘अमृत’च्या कामासंदर्भात मनपाने यापूर्वीही मक्तेदार जैन कंपनीला पत्र दिले होते. त्यावर जैन इरिगेशनने मनपाला खुलासा पाठविला होता, यावर खुलाश्यावर मनपा प्रशसनातर्फे शहर अभियंता सुनील भोळे यांनी मक्तेदार जैन इरिगेशनला पाठविलेल्या पत्रात हा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच मक्तेदार कंपनीने खुलाशात वापरलेली भाषाही योग्य नसून अशीच भाषा वापरल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.आधीच रस्त्यांची दूरवस्था झालेली असताना अमृत योजनेमुळे रस्ते खोदण्यात आल्याने व त्यातच पावसाळा सुरू झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.त्यातच विधानसभा निवडणुकाही तोंडावर असल्याने मनपातील सत्ताधाऱ्यांकडून या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात आहेत.दरम्यान, या पत्रांच्या प्रती मनपातर्फे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, मजिप्रा यांनाही माहितीस्तव दिल्या आहेत.योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण- जैैन इरिगेशनचा दावाया आरोपांबाबत मक्तेदार जैन इरिगेशनला विचारणा करण्यात आली असता त्यांनी दिलेल्या खुलाशानुसार या योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.नवीन पाईपलाईनची टाकण्याची जागा ही जुन्या पाईपलाईनच्या लागून असल्याने तसेच रस्त्यांचे जास्त नुकसान होऊ नये यासाठी काळजीपूर्वक काम करावे लागत आहे.अद्ययावत तंत्रज्ञानाने हे काम करता आले असते. मात्र त्याचा खर्च मनपाला व नागरिकांना परवडणारा नव्हता.म्हणून पारंपरिक पद्धतीने हे काम सुरू आहे. तांत्रीक आराखड्यानुसार काही बाबींचा उल्लेख स्पष्ट असला तरीही त्याचा अर्थ ग्राह्य धरणे, परिस्थितीनुसार नवीन कामांना मंजुरी घ्यावी लागते. हे काम संबंधीत व्यवस्थेकडून तत्परतेने झाल्यास कामाची गती वाढण्यास मदत होईल.अमृतच्या कामाबाबत जैन कंपनीतर्फे करण्यात आलेला खुलासा समाधानकारक नाही. अमृतच्या कामासंदर्भात मनपाने वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यावर जैनतर्फे १८ एप्रिल २०१९ रोजी अमृतच्या कामाचे सुधारीत वेळापत्रक सादर करण्यात आले. मात्र, त्या वेळापत्रकानुसार आणि नियोजनानुसार काम होत नसून, कामाला विलंब होत असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. तसेच जैनतर्फे सादर करण्यात आलेल्या खुलाश्यात मनपाला जबाबदार धरण्यात आले असून, हे पूर्णत : चुकीचे आहे. मनपाचे मक्तेदार म्हणून काम करताना महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करणे मक्तेदारास बंधनकारक आहे. अमृतच्या कामासंदर्भात मक्तेदाराने मनपाला सादर केलेल्या वेळापत्रकानुसार काम करणे, मक्तेदाराची जबाबदारी आहे आणि जर त्यानुसार काम होत नसेल तर यास मनपा जबाबदार नाही.बांधण्यात आलेल्या पाण्याच्या उंच टाक्यांचे बिल मनपाने दिले नसल्याचा उल्लेख जैन कंपनीने खुलाश्यात केला आहे. वास्तविक मनपाने वेळोवेळी पैसे अदा केले असून, ते देयक मान्य असल्याबाबत मक्तेदारकंपनीच्या प्रतिनिधीची स्वाक्षरीदेखील आहे. त्यामुळे करण्यात आलेला खुलासा निरर्थक असून, एकप्रकारे ‘अमृत’चे काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करणारा खुलासा आहे.पाईप लाईनच्या खोदलेल्या चारीची रुंदी ०. ७५ मीटर असताना ०. ४५ मीटरची मापे दिली जातात आणि कमी पैसे दिले जातात, हा मक्तेदार जैन कंपनीचा आरोप चुकीचा आहे. मनपाचे अभियंता आणि मक्तेदाराचे अभियंता यांनी सोबत केलेल्या मोजणीनंतरच मापे घेतली असून, ही मापे मान्य असल्याची जैन कंपनीच्या अभियत्यांची स्वाक्षरी असून, त्यामुळे चुकीच्या बाबींची मागणी करु नये.जीएसआर व सम्पचा मोबदला निविदेनुसार न देता, त्यापेक्षा कमी देण्यात येत असल्याचा उल्लेख जैनने केला आहे. मात्र, वेतन देताना मिळणाºया देयकातील रक्कमेवर मान्यते दाखल आपण:च स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे जैनने चुकीचे विधान करुन, वेळ वाया न घालवता कामाचे नियोजन करावे.अमृतच्या निविदेतील कामांसाठी वेळोवेळी जागांची संयुक्त पाहणी करुन सर्व प्रकारच्या सूचना जैन कंपनीला दिल्या. मात्र, कंपनी अद्याप या कामासंदर्भात मनपाचे मार्गदर्शन मिळाले नाही. असे विधान करुन कार्यादेशानुसार कामे न करता मनपा जबाबदार असल्याचे वारंवार वेगवेगळ््या पत्रांद्वारे सांगत आहेत. यावरुन मक्तेदार जैन कंपनी कार्यादेशानुसार कामे करित नसल्याचे दिसून येते.जैन कंपनीतर्फे सादर करण्यात आलेल्या खुलाश्यातील दुसºया क्रमाकांच्या उत्तरातील भाषा ही योग्य नाही. या बाबत कंपनीला पुन्हा सुचना करण्यात येत की, अशा प्रकारची विधाने कायम राहिल्यास, मनपातर्फे कारवाई करण्यात येईल. तसेच रस्ता दुरुस्तीच्या कामासंदर्भात अतिरिक्त तांत्रिक कामासंदर्भात आपल्या प्रतिनिधीची स्वाक्षरी आहे. काही तांत्रिक मुद्दे मान्य नसल्याबाबत आपण दोन महिने कुठलिही चर्चा न करता काम पूर्ण करण्याबाबत बैठक घेतली असता टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा कळविण्यात येते की, अर्टी-शर्तींचे उल्लघंन करु नये. तसेच मनपाच्या ३१ जुलै २०१७ रोजीच्या क्रमांक १९५ च्या पत्राद्वारे आपणास सूचना करण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा असंबद्ध भाषेचा वापर केलेला नाही. त्यामुळे जैन कंपनीने खुलाशात केलेली विधाने चुकीची आहेत.तसेच मनपाद्वारे पुन्हा कळविण्यात येते की, सात दिवसांच्या आत कामाचा वेग सुधारुन काम पूर्ण करण्याच्या दुष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही मनपातर्फे मक्तेदार जैन इरिगेशनला देण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव