शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंच्या संपत्तीची चौकशी करा, आमदार सुरेश भोळेंच्या लेटरहेडवरुन कोर्टाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 14:30 IST

एकनाथ खडसे यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशा आशयाची तक्रार आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे. 

जळगाव :  माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा बेहिशेबी मालमत्ता आहे, त्याशिवाय कन्या रोहिणी खडसे-खेवलकर चेअरमन असलेल्या जिल्हा बॅँकेतून खडसे यांनी कोट्यवधीच्या नोटा बदल केल्या आहेत. याची सीबीआय चौकशीही करण्यात आली आहे, अशा आशयाची तक्रार आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, आपली बदनामी करण्याच्या हेतूने  कोणीतरी हा प्रकार केल्याचे आमदार भोळे यांनी म्हटले असून त्याबाबत शनिवारी सायंकाळी त्यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कराळे यांनीही भोळे यांचे पत्र मिळाल्याची माहिती ‘लोकमत’ ला दिली. 

काय आहे खडसेंविरुद्ध तक्रार?खडसे यांचा मूळ व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आहे. याबाबत समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. ताहिलरामानी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. खडसेंच्या कन्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतून कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली असून ती दाबण्यात आली, असेही पत्रात म्हटले आहे. भोळे यांची हुबेहूब स्वाक्षरी या पत्रावर आहे. त्याच्यावर जावक क्रमांक मात्र नमूद करण्यात आलेला नाही.

खडसे आमचे नेते व गुरुही आहेत. आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने  कुणीतरी हे कृत्य केले आहे. पक्षाच्या प्रदेश कमिटीने मला याची माहिती दिली. त्यामुळे मी तत्काळ प्रदेशाध्यक्ष व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्र देऊन चौकशीची मागणी केली.-सुरेश भोळे, आमदार

आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी पत्र दिले. खडसे यांच्याविरुद्ध भोळे यांच्या लेटरहेडवर खोटी तक्रार केल्याचे म्हटले आहे. अशा प्रकरणात आपला सहभाग नाही व त्यावर लक्ष ठेवावे म्हणून त्यांनी विनंती केली आहे.- दत्तात्रय कराळे,  पोलीस अधीक्षक 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपा