शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

जळगावचा पारा ४६ अंशावर, उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:33 PM

नऊ वर्षानंतर चढला पारा

जळगाव : यंदाच्या तापमानाने उच्चांक गाठला असून, स्कायमेट या खासगी हवामान खात्याचा अंदाजानुसार गुरुवारी शहरात ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात तब्बल ९ वर्षानंतर पहिल्यांदाच पारा ४६ अंशापर्यंत पोहचला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या कोरड्या व उष्ण वाऱ्यांचे प्रमाण वाढणार असल्याने २६ ते २८ एप्रिल दरम्यान शहरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.महिनाभरापासून जळगावकरांना तापमानाचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. गुरुवारी तापमानाने ४६ अंशावर उसळी घेतली होती. त्यामुळे नागरिक प्रचंड तापमानाने अक्षरश घामाघूम होत आहेत. एप्रिल महिन्यातच तापमानाने ४५ अंशाचा पारा पार केल्यामुळे मे महिन्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एप्रिल २०१० मध्ये तापमानाचा पारा ४६ अंशावर पोहचला होता. त्यानंतर एप्रिल २०१७ व २०१८ मध्ये ४५ अंशावर तापमानाचा पारा गेला होता. यंदा मे महिन्यात पारा आणखीनच वाढण्याची भीती हवामान खात्यातून वर्तविण्यात आली आहे.तीन दिवस उष्णतेची लाटआगामी तीन दिवस पूर्वेकडून येणाºया कोरड्या व उष्ण वाºयांचे प्रमाण वाढणार असल्याने २६ ते २८ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तापमान वाढीसह वाºयांचा वेग देखील ११ ते १४ किमी प्रतितास असल्याने उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. पुढील तीन दिवस नागरिकांनी महत्वाचे काम असेल तरच बाहेर निघण्याचे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले असून, दुपारच्या वेळेस घराबाहेर निघताना पांढरा रुमाल, गॉगलचा वापर करण्याचा सल्ला देखील देण्यात येत आहे. दरम्यान, या दिवसात जास्तीत पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.अंगाची लाही-लाही, अन् घामाच्या धाराप्रचंड तापमानामुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून, घरात पंखा लावूनही घामाच्या धारा वाहत असल्याने उन्हाळा नागरिकांना आता असह्य होवू लागला आहे. दुपारच्या वेळेस मुख्य रस्ते निमर्नुष्य होत असून, आकाशात चिटपाखरूही पहायला मिळत नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव