शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: चोपडा येथे कापड दुकानाला भीषण आग, तरुणाचा जळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 09:50 IST

Jalgaon: चोपडा मेन रोडवर राहुल एम्पोरियम या  तीन मजली कापड दुकानास आग लागून त्यात गौरव राखेचा (२६) या तरुणाचा जळून मृत्यू झाला.

- शाम जाधवजळगाव - मुख्य बाजार पेठेतील  राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री दोन ते अडीच दरम्यान आग लागली.आगीत गौरव राखेचा (२७) या तरुणाचा जळाल्याने करुण अंत झाला.

तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या मेनरोड वरील राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस मध्यरात्री अचानक आग लागली.  आग इतकी भयंकर होती की,आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले.आगीच्या  ज्वाला दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून खिडकीच्या बाहेर येत होते,आगीची माहिती मिळताच पोलीस,नगर पालिका प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी चोपडा, अमळनेर, धरणगाव, यावल, शिरपूर, जळगांव येथील अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती.

नगर पालिकेचे फायर विभागाचे कर्मचारी व  शहरातील तरुण यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम केले.यात घरात अडकलेल्या पाच वर्षीय चिमुकलीसह सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले.  मात्र  गौरव हा जीव वाचवण्यासाठी इतरत्र जागा शोधण्याच्या नादात बेडरूम मधून बाथरूम मध्ये थांबला. तिथेच त्याचा घात झाला.सकाळी सहा वाजता बाथरूममध्ये  जळालेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. 

बेडरूम मधेच राहिला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. या आगीत इमारतीचे दोनही मजले जळून खाक झाले आहेत.आग इतकी तीव्र होती की घरातील  पीओपी,घरातील, जिन्यातील फरशा, किचन ओटा, भांडी जळून कोळसा झाले आहेत.

 सोफ्याच्या ड्रावरमध्ये ठेवलेली नोटांची बंडल जळाली. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास लागलेल्या  आगीवर सहा वाजता नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र गौरव याला वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगJalgaonजळगाव