जळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची 40 टक्के आवक घटली
By Admin | Updated: June 1, 2017 16:08 IST2017-06-01T16:08:04+5:302017-06-01T16:08:04+5:30
लिलाव झाला : दुस:या दिवसापासून जाणवणार परिणाम

जळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची 40 टक्के आवक घटली
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1 - कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी शेतक:यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्यात दिवशी जळगावात येणा:या भाजीपाला, फळ, धान्य यांच्या आवकवर परिणाम ही आवक 40 टक्क्याने घटली आहे. आज संपामुळे भाजीपाला काढला जाणार नसल्याने शुक्रवारपासून याचा अधिक परिणाम जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज आलेल्या 60 टक्के मालाचा पूर्णपणे, शांततेत लिलाव झाला व बाजार समितीतील कामकाज सुरळीत सुरू होते.
पहिल्यात दिवशी 40 टक्के आवक घटली
संपाच्या पहिल्याच दिवशी जळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळ, धान्य यांची 40 टक्क्याने आवक घटली. संपाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात इतर भागात तोडफोड होऊ लागल्याने भाजीपाल्याची अनेक वाहने जळगावात आलीच नाही. त्यामुळे केवळ 60 टक्के आवक राहिली.
भाववाढ
आवक कमी होताच बाजार समितीपासून भाववाढ होण्यास सुरुवात झाली. दररोजच्या लिलावापेक्षा 10 टक्क्याने भाव वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
माल घेण्यासाठी झुंबड
आवक घटल्याने किरकोळ विक्रेत्यांनी माल खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सर्व प्रकारचा भाजीपाला आपल्याला मिळाला पाहिजे, यासाठी सर्वच ठिकाणी झुंबड पडताना दिसून आली.
लिलाव सुरळीत
जेवढा माल आला त्याचा पूर्णपणे शांततेत लिलाव झाला. यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. सकाळर्पयत चालणारा भाजीपाल्याचा लिलाव झाल्यानंतर कांदे, बटाटे यांचाही लिलाव सुरळीत झाला.
धान्याचीही आवक सुरू
बाजार समितीतील धान्य बाजारावरही परिणाम होऊन त्याचीही आवक 40 टक्क्याने घटली. मात्र इतर शेतकरी आणत असल्याने काही प्रमाणात आवक सुरू होती.