शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरतेत ‘डबल मर्डर’ करणारे दोघे जळगाव एलसीबीच्या ताब्यात

By विजय.सैतवाल | Updated: June 28, 2024 23:01 IST

१६ लाखांची सुपारी घेऊन केले होते खून : एकावर खुनाचे पाच तर दुसऱ्यावर अन्य १५ गुन्हे

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : १६ लाख रुपयांची सुपारी घेवून सुरत येथे दोन जणांचा गळा कापून खून करत फरार असलेल्या दोन कुविख्यात गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून अटक केली आहे. अफजल अब्दुल शेख (३८, रा. उमरपाडा, सुरत) व प्रज्ञेश दिलीप गामीत (२६, रा. तरकुवा डुंगरी फलिया, जि. तापी, गुजरात) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनी खुनाची कबुली दिली असून एकावर खुनाचे पाच तर दुसऱ्यावर १५ वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.  

या संदर्भात पोलिस दलाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सुरत येथील दुहेरी खून प्रकरणात अटक केलेल्या अफजल अब्दुल शेख व प्रज्ञेश गामीत या दोघांनी कबुली देताना सांगितले की, १६ लाख रुपयांची सुपारी दिल्याने सुरत येथील दोन जणांचा गळा कापून खून केला होता. ८ जून रोजी ही घटना घडल्यानंतर हे दोघे जण फरार होते.  

गुजरात पोलिसांचे ११ पथक मागावर

फरार असलेल्या या दोघांच्या शोधार्थ गुजरात पोलिसांचे ११ पथक त्यांच्या मागावर होते.  दोन्ही सराईत गुन्हेगार जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ अक्रम शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोकॉ सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.  

दोघांवर गंभीर गुन्हे दाखल

जळगाव पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता अफजल अब्दुल शेख याच्यावर खुनाचे पाच गुन्हे दाखल आहे तर  प्रज्ञेश गामीत याच्यावर वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल  आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी