शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रात्री ११ वाजता कंटेनरच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:09 IST

कामावरुन घरी परत जात असताना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या कंटनेरने दुचाकीला धडक दिल्याने त्यात गोपाळ शांताराम पाटील (३८, रा.धानवड, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. विमानतळाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर तब्बल एक तास मृतदेह जागेवरच पडून होता.

ठळक मुद्दे विमानतळाजवळ अपघात कंटेनरचालक मद्याच्या नशेत

जळगाव : कामावरुन घरी परत जात असताना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या कंटनेरने दुचाकीला धडक दिल्याने त्यात गोपाळ शांताराम पाटील (३८, रा.धानवड, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. विमानतळाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर तब्बल एक तास मृतदेह जागेवरच पडून होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ पाटील हा तरुण चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. रोज रात्री १० ते  ११ वाजता काम संपल्यानंतर तो दुचाकीने धानवड येथे जात होता. शनिवारी घरी जात असताना विमानतळाजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाºया कंटनेरने दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात गोपाळ जागीच ठार झाला. कंटेनर चालक मद्याच्या नशेत होता, पळून जात असताना लोकांनी त्याला कुसुंबा गावाजवळ पकडले.दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक गणेश सोनवणे यांनी सहकाºयांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तेथून रुग्णवाहिका व पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर मृत गोपाळचा मोठा भाऊ नवल पाटील, गावातील भाऊसाहेब पाटील व इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून रात्री १२.१५ याजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी कंटेनर व चालकाला ताब्यात घेतले आहे.गोपाळ याच्या पश्चात आई मनकर्णाबाई, वडील शांताराम देवबा पाटील, पत्नी वर्षा, भाऊ नवल, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव