शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

जळगाव जि़प. सदस्य पतीची सीईओंना शिविगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:58 AM

अधिकारी पैशांसाठी कामे करीत नसल्याचा आरोप

जळगाव : शिक्षिकेच्या बदलींसदर्भात विचारपूस करण्यासाठी गेल्यावर सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांना शिविगाळ केल्याचा प्रकार जिल्हा परिषदेत शनिवारी दुपारी घडला़ दरम्यान, ही फाईल खासदार उन्मेष पाटील यांच्या नातेवाईकांची असल्याची माहिती मिळाली़मिळालेल्या माहितीनुसार खासदार उन्मेष पाटील यांचे शालक हे धरणगाव येथील रहिवासी आहेत, त्यांच्या पत्नी जळगाव महापालिका शाळेत शिक्षिका आहेत, त्यांना अपडाऊनचा त्रास होत असल्याने नियमानुसार त्यांची जिल्हा परिषद शाळेत बदली करून द्यावी, या कामासाठी ते सीईओंच्या दालनात आले होते, त्यावेळी हा प्रकार घडला.हु आर यु म्हणताच संतापशनिवारी जि़ प सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासोबत चंद्रशेखर अत्तरदे सीईओंची भेट घ्यायला त्यांच्या दालनात गेले़ यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांच्याशी ते चर्चा करीत होते. यावेळी त्यांनी फाईलसंदर्भात विचारपूस केली़ यावर सीईओंनी त्यांना हु आर यू हा प्रश्न विचारला यावरून संतप्त होत अत्तरदे कॅबीनच्या बाहेर आले व त्यांनी सीईओंना शिविगाळ केल्याची माहिती आहे़ यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी़ एस़ अकलाडे यांच्या दालनातही त्यांनी संताप व्यक्त केला़ सीईओ पाटील हे दहा ते पंधरा मिनिटातच जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीसाठी रवाना झाले़ फाईलवर स्वाक्षरी झालेली होती, मात्र, रिक्त जागेच्या पडताळणीसाठी फाईल पेंडीग होती़ अशी माहिती मिळाली़ दरम्यान, चंद्रशेखर अत्तरदे यांनी या आधिही जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात तसेच महापालिकेतही अशाच प्रकारे संताप व्यक्त केला होता़ दरम्यान, सीईओ डॉ़ पाटील हे सदस्यांना ओळखत नाहीत, त्यांना योग्य वागणूक देत नाहीत, तर सामान्य माणसांना न्याय कधी मिळणार असा सवाल अत्तरदे यांनी उपस्थित केला आहे़मी मुंबईला आहे, मला या प्रकरणाची कसलीही कल्पना नाही, मात्र माहिती घेऊनसांगतो -उन्मेष पाटील, खासदारमतदार संघातील शिक्षिकेच्या बदलीसंदर्भातील फाईल वांरवार पाठपुरवा करूनही मार्गी लागत नाही, मतदार आम्हाला बोलतात़ अधिकाऱ्यांकडून सदस्यांना सन्मान दिला जात नाही, सीईओ मला विचारतात हु आर यू... आम्ही लोकांची कामे घेऊन येतो आणि पैशांसाठी हे आज करू उद्या करू... अशी टाळाटाळ करतात़ मग संताप होणारच, मी पाच दिवसांपासून त्यांना फोन केले, खासदारांनी स्वत: त्यांना फोन केला, तरीही काम होत नव्हते़- चंद्रशेखर अत्तरदे.

टॅग्स :Jalgaonजळगाव