राज्य केमिस्ट संघटनेच्या सेंट्रल झोनमध्ये जळगावला दोन पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:03 IST2017-09-10T20:49:40+5:302017-09-10T21:03:12+5:30
सुनील भंगाळे अध्यक्षपदी : ब्रजेश जैन सहसचिव, पाच जिल्ह्यांचे नेतृत्व

राज्य केमिस्ट संघटनेच्या सेंट्रल झोनमध्ये जळगावला दोन पदे
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या सेंट्रल झोन अध्यक्षपदी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांची तर सहसचिवपदी जळगावचे उपाध्यक्ष ब्रजेश जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोबतच धुळ्य़ाचे राजेश देसले यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाच जिल्ह्याचे नेतृत्व करणा:या या संघटनेमध्ये जळगाव जिल्ह्याला दोन पदे मिळाली आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक, अहमदनगर जिल्ह्याच्या या सेंट्रल झोन संघटनेची निवडणूक शिर्डी येथे झाली. यामध्ये जळगाव व धुळे येथील या पदाधिका:यांच्या निवडीसह उपाध्यक्षपदी अजित पारेख (शिर्डी) तर सचिव म्हणून शशांक रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मदन पाटील (कोल्हापूर) यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवडीसाठी जळगावचे सचिव अनिल झवर, संदीप बेदमुथा, श्याम वाणी, इरफान सालार, राजेंद्र बलधोतरा (अहमदनगर), राजेंद्र बिंडोडिया, बंटी चौधरी (धुळे), संजय कासोदेकर, विनय श्रॉफ, महेश पवार (नंदुरबार) यांनी प्रयत्न केले.