शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काढणी झालेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग, हाता-तोंडाशी आलेला घास आगीने हिरावला

By विजय.सैतवाल | Updated: March 17, 2024 23:57 IST

Jalgaon News: दोन एकरांतील काढून ठेवलेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसांसह चारा पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरसोली येथील नायगाव शिवारात घडली.

- विजयकुमार सैतवालजळगाव - दोन एकरांतील काढून ठेवलेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसांसह चारा पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरसोली येथील नायगाव शिवारात घडली.

शिरसोली येथील शेतकरी बळवंत पाटील यांचे नायगाव शिवारात शेत असून दोन एकरांमध्ये त्यांनी दादरची पेरणी केली हाेती. या पिकाची काढणी करून ते शेतातच चाऱ्यासह ठेवले होते. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वीज खांबावरील तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले व ठिणग्या दादरच्या पिकावर पडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या पिकाने पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण पीक आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत दादरचे कणसं तसेच चाराही जळून खाक झाला.

आग धगधगत असल्याचे दिसताच ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतमालक बळवंत पाटील यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी शेतात धाव घेतली. त्यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा मारा करण्यासह झाडांच्या फांद्यांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत सर्व पीक जळून खाक झाले होते.

शेतात ठेवलेल्या दादरच्या पिकाचे कणसं व चारा सोमवारी वेगवेगळे करून धान्य घरी नेले जाणार होते. मात्र त्याच्या एक दिवस अगोदरच आगीने हाताशी आलेले उत्पादन हिरावल्या गेले.

सुदैवाने हरभरा पीक सुरक्षितपाटील यांच्या दादरच्या पिकाशेजारीच हरभरा लावलेला असून ते पीकही उभे आहे. सुदैवाने ही आग शेजारील हरभऱ्याच्या पिकापर्यंत व इतर शेतापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे हे पीक सुरक्षित राहिले.

आज पंचनामा होणारआगीच्या घटनेनंतर शेतकऱ्याने महावितरणच्या शिरसोली उपकेंद्रात माहिती दिली, तसेच तलाठ्यांनाही कळविण्यात आले. दोन्ही जणांकडून सोमवारी पंचनामा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग