जळगावात पोहे बनविणे विद्यार्थिनीला पडले सात हजारात तीनशे रुपयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 20:59 IST2017-12-03T20:56:59+5:302017-12-03T20:59:48+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया जया जिजाबराव पाटील (वय २५, रा.भोकरी, ता.मुक्ताईनगर) विद्यार्थिनीच्या पर्समधून सात हजार लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता भावना क्लासेसच्या इमारतीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया ही शेजारील मैत्रिणीकडे अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तसेच पोहे बनविण्यासाठी गेली होती.

जळगावात पोहे बनविणे विद्यार्थिनीला पडले सात हजारात तीनशे रुपयात
लोकमत आॅनलाईन
जळगाव दि,३ :स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या जया जिजाबराव पाटील (वय २५, रा.भोकरी, ता.मुक्ताईनगर) विद्यार्थिनीच्या पर्समधून सात हजार लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता भावना क्लासेसच्या इमारतीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया ही शेजारील मैत्रिणीकडे अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तसेच पोहे बनविण्यासाठी गेली होती.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, जया पाटील ही विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याने कोठारी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ए.एन.पाटील उर्फ बाळू पाटील यांच्या मालकीच्या भावना क्लासेसच्या इमारतीत भाड्याने राहायला आहे. शेजारच्या खोलीत पुनम पाटील (रा.जैतपीर, ता.अमळनेर), धनश्री पाटील (रा.हडसन, ता.पाचोरा), भाग्यश्री शेवाळे (रा.धुळे) राहतात तर वर्षा पाटील (रा.लोणे, ता.धरणगाव) ही परीक्षेसाठी एक दिवसासाठी आलेली होती. रविवारी सकाळी खोलीचा दरवाजा उघडा ठेवून जया ही शेजारच्या मैत्रिणीकडे पोहे बनविण्यासाठी तसेच पाणी गरम करण्यासाठी गेली असता साडे सहा ते साडे सात या वेळेत बॅगेतून सात हजार तीनशे रुपये कोणीतरी लांबविले. घर मालक बाळू पाटील हे त्या वेळी पार्कींगकडून वर राहत असलेल्या घराकडे जात होते. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर जया व तिच्या मैत्रिणींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.