शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

By ajay.patil | Updated: September 15, 2022 13:17 IST

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे

- अजय पाटीलजळगाव -  जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे. २०१९ पासून गिरणा धरण सलग चार १०० टक्के भरले असून, धरणाची बांधकाम पुर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच सलग चार वर्ष या धरणात १०० टक्के जलसाठा राहणार आहे. धरण तयार झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या ५३ वर्षात हे धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी एक असलेले व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्याने जुलै महिन्यातच नव्वदी गाठली होती. गिरणा धरणाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच गिरणा धरण जुलै महिन्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले होते. धरण १०० टक्के भरले असल्याने गिरणेतून दोन दरवाज्यातून २ हजार ४४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, धरणातील जलसाठ्यात आवक वाढल्यास धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.

गिरणा धरणाची माहिती- १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.- सलग १४ वर्ष काम झाल्यानंतर १९६९ मध्ये या धरणाचे लोकार्पण करण्यात आले.- १९७३ मध्ये गिरणा धरणात पहिल्यांदाच जलसंपन्न झाले.- ५३ वर्षात गिरणा धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.- या प्रकल्पासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च आला होता.

या वर्षांमध्ये धरण भरले १०० टक्के१९७३ मध्ये हे धरण पहिल्यांदाच जलसंपन्न झाल्यानंतर १९७६ मध्ये पहिल्यांदाच १०० टक्के भरले होते. त्यानंतर १९८०, १९९४, २००४ ते २००७ सलग १०० टक्के भरले. त्यानंतर २०१९ पासून ते यंदापर्यंत हे धरण १०० टक्के भरत आले आहे.

हे सहा तालुके गिरणेवर अवलंबून१. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव व जळगाव या तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न गिरणेमुळे सुटतो.२. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफुट असून, यातील जिवंत पाणीसाठा वगळून ३ हजार दशलक्ष घनफुट मृत साठा आहे.३. गिरणा धरणात चणकापूर, पुनद या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव