शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी, मोरया केमिकल कंपनीतील घटना

By ajay.patil | Updated: April 17, 2024 11:56 IST

Jalgaon Fire News: जळगाव येथील एमआयडीसी मोरया ग्लोबल कंपनीसह  केमिकलच्या दोन कंपन्या बुधवारी सकाळी ८ वाजता सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे.

- अजय पाटीलजळगाव - येथील एमआयडीसी मोरया ग्लोबल कंपनीसह  केमिकलच्या दोन कंपन्या बुधवारी सकाळी ८ वाजता सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे. दोन कंपन्यामध्ये ही आग भडकली असून आठ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

घटनेत करण जगबिर संधू (वय २०, रा. अमरावती) आणि उमेश जगदीश कोळी (वय ३० रा. यावल) हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी जळगाव महानगरपालिका व इतर अग्निशमन दलाचे बंब दाखलं होत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य करीत आहेत. दरम्यान आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

कंपनीत आठ महिला व काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील  तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी मंगल पाटील याला बाहेर काढण्यात आले आहे. समाधान नारायण पाटील हा युवक मध्ये अडकला आहे.

टॅग्स :fireआगJalgaonजळगाव