शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : चाळीसगाव पालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:42 IST

चाळीसगाव नगर पालिकेतर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन हे अभियान राबविले  जात आहे. शहरात मंगळवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अभियानाला सुरुवात झाली.

जळगाव, दि. 5 -  चाळीसगाव नगर पालिकेतर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन हे अभियान राबविले  जात आहे. शहरात मंगळवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अभियानाला सुरुवात झाली. गणपती मूर्ती संकलनासाठी शहरात हनुमानवाडी, सावरकर चौक, कॅप्टन कॉर्नर या तीन ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहेत. निर्माल्यासाठीदेखील संपूर्ण शहरातून घंटागाड्या फिरवल्या जात आहेत. धुळे रोड, हिरापूर रोड, नवीन नाका, खरजई नाका, शिवाजी घाट, चामुंडामाता मंदिर पूल, अहिल्यादेवी होळकर चौक, दत्तवाडी पूल, सदानंद हॉटेल जवळ अशा दहा ठिकाणी निर्माल्य संकलन केले जात आहे. आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेनुसार अभियान राबविले जात असून नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण, गटनेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी नागरिकांना मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रावर  जाऊन पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे. चाळीसगाव शहरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविले जात आहे. मूर्ती व निर्माल्य संकलनामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन अभियानाचे पर्वच या वर्षापासून सुरू होत असल्याची प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. देशमुख नवरात्रोत्सव मंडळातर्फे १५ वर्षापासून मूर्ती संकलन सुवर्णाताई देशमुख नवरात्रोत्सव मंडळातर्फेही गेल्या १५ वर्षापासून गणेश विसर्जनाच्या पर्वावर मूर्ती व निर्माल्य संकलन केले जात आहे. या उपक्रमामुळे शहरातील अनेक विहिरींचे प्रदूषण थांबले. विशेष म्हणजे हनुमान वाडीतील विहीर पुर्नजिवीत झाली आहे. पूर्वी याच विहिरीत गणेश विसर्जन केले जायचे. मंडळातर्फे संकलित मूर्ती धरणाच्या पाण्यात एकत्रितपणे विसर्जित केल्या जातात. मंडळाचे अध्यक्ष व पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम यांनी हा उपक्रम १५ वर्षापुर्वी सुरु केला आहे. त्यांच्या मंडळामार्फत हनुमानवाडीत मूर्ती संकलन केले जाते. माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरु केल्याचे प्रदीप निकम यांनी 'लोकमत'शी बोलतांना सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव