शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: डमी ग्राहकाने उधळला ‘ड्रग्ज’चा बाजार, आठ दिवसांपासून पोलिसांचा ‘वॉच’

By विजय.सैतवाल | Updated: March 20, 2024 22:42 IST

Jalgaon News: मुंबईतून आलेले अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण फिरत असताना ग्राहक हाती लागल्याचे त्यांना समाधान झाले, मात्र ग्राहक बनून गेलेल्या ‘डमी’नेच भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावला.

- विजयकुमार सैतवालजळगाव - मुंबईतून आलेले अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण फिरत असताना ग्राहक हाती लागल्याचे त्यांना समाधान झाले, मात्र ग्राहक बनून गेलेल्या ‘डमी’नेच भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावला. विशेष म्हणजे पोलिस पथक गेल्या आठवड्यापासून सापळा रचून होते. पक्की खबर मिळताच दोघे जाळ्यात अडकण्यासह लाखोचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.

विक्रीसाठी पुरवण्यात आलेले अमली पदार्थ घेऊन फिरणाऱ्या दोघांकडून भुसावळ येथे ७२ लाख ८० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करताना पोलिसांनी गुप्तता पाळत आठ दिवसांपासून जाळे टाकून ठेवले होते.

जास्त मिळेल का?भुसावळ येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी अटक केलेल्या कुणाल भारत तिवारी (३०, रा. तापीनगर, भुसावळ) आणि जोसेफ जॉन वालाड्यारेस (२८, रा. कंटेनर यार्ड, भुसावळ) हे दोघेही उच्चशिक्षित असून सधन कुटुंबातील आहेत.  अमली पदार्थ विक्रीचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग. काही पैस मिळणार म्हणून त्यांनी हे अमली पदार्थ हाती घेतले व ग्राहकांच्या शोधात निघाले. यात पोलिसांनी चार दिवसांपूर्वी डमी ग्राहक पाठविला व त्याने अमली पदार्थाच्या तीन-चार पुड्या दोघांकडून घेतल्या. त्यानंतर मंगळवारी पुन्हा डमी ग्राहक दोघांकडे गेला व जास्त ड्रग्ज मिळेल का म्हणून विचारणा केली. त्यांनी होकार दिला व ‘डमी’ने खरेदीची तयारी दाखवली. त्याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून असलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी काही प्रमाणात माल विक्री केला होता. मात्र मोठ्या प्रमाणातील ड्रग्ज इतरत्र पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी जप्त केले. जास्त भावाने मागणीदोघं तरुण ग्राहकांच्या शोधात असल्याने डमी ग्राहकाने जास्त ड्रग्जची मागणी तर केलीच शिवाय पाच हजार रुपये प्रति ग्रॅम अशा वाढीव भावाने खरेदीचीही तयारी दाखवली. त्यामुळे दोघे तरुण पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकले.

पुरवठादारावर तीन गुन्हेदोघं तरुणांकडे अमली पदार्थ विक्रीसाठी देणारा दिपेश मुकेश मालवीय (रा. वरणगाव रोड, भुसावळ) याच्यावर या पूर्वीच तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.एका पथकाने मुंबईतून आणखी एकाला उचललेभुसावळ येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणात हा माल मुंबई येथून आल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे एक पथक मुंबईला रवाना झाले. तेथून आणखी एका जणाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ