जळगावातील डॉक्टर लूट प्रकरणी धुळ्याच्या चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:55 IST2018-11-07T12:55:40+5:302018-11-07T12:55:51+5:30

जळगाव : बालरोग तज्ज्ञ डॉ.निषाद यशवंत पाटील यांच्या निवासस्थानी २९ आॅक्टोबर रोजी सव्वा पाच लाखाची लूट केल्याप्रकरणी जिल्हा पेठ ...

In Jalgaon doctor's robbery case, the arrest of Dhule Dhori | जळगावातील डॉक्टर लूट प्रकरणी धुळ्याच्या चोरट्यास अटक

जळगावातील डॉक्टर लूट प्रकरणी धुळ्याच्या चोरट्यास अटक

जळगाव : बालरोग तज्ज्ञ डॉ.निषाद यशवंत पाटील यांच्या निवासस्थानी २९ आॅक्टोबर रोजी सव्वा पाच लाखाची लूट केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी रियाज शहा रईस शहा (वय १९, रा.आझाद नगर, धुळे) याला मंगळवारी अटक करण्यात आली.
दरम्यान, त्याचा एक साथीदार फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी जाकीर पिरन खाटीक (वय ४०, रा.तांबापुरा, जळगाव) व मास्टर मार्इंड चेतन भागवत सूर्यवंशी (वय २७, रा.वाघनगर, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: In Jalgaon doctor's robbery case, the arrest of Dhule Dhori