शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्याचा नऊ कोटींवरील निधी मंत्रिमंडळ विस्तारात अडकला

By विजय.सैतवाल | Updated: August 8, 2022 15:02 IST

पालकमंत्री नियुक्तीअभावी महिना उलटूनही ‘डीपीसी’च्या निधीवरील स्थगिती उठेना 

- विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १ एप्रिल २०२२ पासून कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देऊन महिना उलटला तरी पालकमंत्र्यांअभावी ही स्थगिती उठली जात नसल्याने विविध कामांना ब्रेक लागला आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडून पालकमंत्री न मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील ९ कोटी ३३ लाख ३० हजार ३०६ रुपयांच्या कामांवरील स्थगित उठण्याची विविध यंत्रणांना प्रतीक्षा आहे. 

नवीन आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनांचे नियोजन करून निधीची तरतूद करण्यात आली. मात्र त्यानंतर राज्यातील सत्ता नाट्याने विविध कामांना ब्रेक लावला गेला. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या जिल्हा वार्षिक योजनांसाठीच्या निधीला स्थगिती देण्यात आली. ज्या ठिकाणी सध्याच्या युती व्यतिरिक्त इतर पक्षांचे पालकमंत्री आहे, त्या जिल्ह्यांना टार्गेट करण्याच्या प्रयत्नात जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील हे युती सरकारसोबत असले तरी जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता दिलेला निधी स्थगितीमुळे खर्च होऊ शकत नाही. 

यात राजकारण असले तरी येत्या काही काळात सर्व जिल्ह्यातील पालकमंत्री, जिल्हा नियोजन समिती यांची नव्याने नियुक्ती तर समितीच्या नामनिर्देशित व निमंत्रित सदस्यांचे पुनर्गठन होणे अपेक्षित असल्याचे कारण देत सर्वच जिल्ह्यातील निधीला स्थगिती देण्यात आली आहे.  यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता दिलेल्या ९ कोटी ३३ लाख ३० हजार ३०६ रूपयांची कामे स्थगित आहे.

कामांच्या यादीचे होणार पालकमंत्र्यांकडून पुनर्विलोकननवीन पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर सदर प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांची यादी ही पालकमंत्र्यांकडून पुनर्विलोकनार्थ सादर केली जाईल. त्यानंतर ती कामे पुढे चालू ठेवावीत किंवा काय करावे, याबाबत पालकमंत्री निर्णय घेतील.

एकूण ४५२ कोटी रुपयांचा निधी जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत एकूण ४५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी  ९ कोटी ३३ लाख ३० हजार ३०६ रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र शासनाच्या निर्देशानुसार या कामांना ब्रेक लागला. यात सर्वाधिक प्रमाण जिल्हा परिषदेला दिलेल्या निधीचे आहे. 

कोणाला आहे अधिकार?नियोजन विभागामार्फत दरवर्षी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हानिहाय निधी कळवून जिल्ह्यांच्या आराखड्याचे प्रारूप तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांना देण्यात येतात. जिल्हाधिकारी आराखड्यांचे प्रारूप तयार करून जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करतात. या आराखड्यात कोणत्या जिल्हास्तरीय योजनांसाठी किती निधी ठेवावा याबाबत समिती निर्णय घेते. मात्र त्यासाठी जिल्ह्याला पालकमंत्री असणे आवश्यक असते. त्यांच्या मंजुरीनंतरच निधी खर्च होऊ शकतो. मात्र पालकमंत्रीच नसल्याने जिल्ह्यातील कामांना ब्रेक लागला आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार