Jalgaon Crime : पत्नीने दारू प्यायल्याच्या संशयावरून पतीने क्रूरतेने तिचा खून केल्याच्या प्रकरणात कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीची हत्या केल्याच्या खटल्यात जळगाव सत्र न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत आरोपीच्या मुलाने वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष महत्वाची ठरली.
मेहुणबारे येथील नदीकाठावरील एका शेतात कुवरसिंग पावरा हा पत्नी निनूबाई सोबत सालगडी म्हणून राहत होता. १८ मार्च २०२२ रोजी रात्री १० च्या सुमारास, कुवरसिंगने निनूबाईला 'तू दारू का पिलीस?' असे विचारून भांडण सुरू केले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या लोखंडी कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात वार केला. रक्तस्राव झाल्याने निनूबाईचा जागीच मृत्यू झाला. चौकशीदरम्यान, कुवरसिंगने दारू पिण्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी दिनेश पावरा यांनी फिर्याद दिली होती तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी तपासाचे काम केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासले गेले, ज्यात फिर्यादी ज्ञानेश्वर माळी, पंच साक्षीदार, डॉ.ए. वाय. शेख आणि तपास अधिकारी यांचा समावेश होता. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपीचा मुलगा गणेश कुवरसिंग पावरा याने न्यायालयात वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष निर्णायक ठरली.
जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी या खटल्यात सरकार पक्षातर्फे काम पाहिले. न्यायाधीश एस.एन. राजुरकर यांनी सर्व साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपी कुवरसिंग पावराला भा.दं. वि. कलम ३०२ नुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि २ हजार दंड ठोठावला.
दरम्यान सोलापूरातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नीने गॅस टाकी आणण्यासाठी ठेवलेल्या एक हजार रुपयातून पतीने दारु पिण्यासाठी १०० रुपये घेतले होते. त्याबाबत विचारणा केल्याने पतीने लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर मारुन तिचा खून केला. या प्रकरणात पतीला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
Web Summary : A Jalgaon man received life imprisonment for murdering his wife, suspecting she was drinking. His son's testimony proved crucial in the conviction. In a separate Solapur case, a husband also received life imprisonment for killing his wife over money used for alcohol.
Web Summary : जलगाँव में एक व्यक्ति को पत्नी के शराब पीने के शक में हत्या करने पर आजीवन कारावास की सजा सुनाई गई। बेटे की गवाही निर्णायक साबित हुई। एक अन्य सोलापुर मामले में, शराब के लिए पैसे इस्तेमाल करने पर पत्नी की हत्या के लिए पति को आजीवन कारावास मिला।