जळगाव जिल्ह्यात महसूल वसुली 40 टक्क्यांवर, उर्वरीत वसुली वाढविण्याच्या दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:58 IST2018-02-01T12:57:59+5:302018-02-01T12:58:04+5:30
जिल्हाधिका-यांनी घेतला विविध कामांचा आढावा

जळगाव जिल्ह्यात महसूल वसुली 40 टक्क्यांवर, उर्वरीत वसुली वाढविण्याच्या दिल्या सूचना
बैठक : जिल्हाधिका-यांनी घेतला विविध कामांचा आढावा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - जिल्ह्यात महसुली 40 टक्क्यांर्पयत आली असून उर्वरीत वसुली वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या. फेब्रुवारी महिन्यापासून वसुलीला वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. या वेळी जिल्हाधिका-यांनी विविध कामांचा आढावा घेऊन सूचना दिल्या.
मार्च महिन्यात जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. त्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिका:यांनी तहसीलदार, प्रांतांना सूचना दिल्या.
यासोबतच मनरेगाची कामे, पुनर्वसनाची कामे, कुळकायदा प्रकरणे यांचाही आढावा या वेळी घेण्यात आला. पुढील वर्षी होणा:या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदार याद्या व इतर कामांबाबतही या वेळी सूचना देण्यात आल्या.