कोरोना लसीकरणात जळगाव जिल्हा १५ व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:04+5:302021-02-05T06:01:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात जिल्हा अद्यापही पंधराव्या क्रमांकावर असून गेल्या आठवडाभरात केंद्रे वाढल्याने संख्या वाढली ...

Jalgaon district ranks 15th in corona vaccination | कोरोना लसीकरणात जळगाव जिल्हा १५ व्या क्रमांकावर

कोरोना लसीकरणात जळगाव जिल्हा १५ व्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात जिल्हा अद्यापही पंधराव्या क्रमांकावर असून गेल्या आठवडाभरात केंद्रे वाढल्याने संख्या वाढली असली तरी रोज सरासरी केवळ ६० टक्केच लसीकरण होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुरुवातीला ७ केंद्रे होती, मात्र वाढीव डोस प्राप्त झाल्यानंतर केंद्रांची संख्या १३ करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे चित्र बघता जळगाव शहरात खासगी आणि शासकीय अशा दोन्ही यंत्रणेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून दोन खासगी रुग्णालयांतील केंद्रांवर शंभरापेक्षाही अधिक लसीकरण नियमित होत आहे. नियमितच्या उद्दिष्टांपेक्षाही अधिक लसीकरण या दोन केंद्रांवर होत आहे. यात सुरुवातीला केवळ खासगी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती. दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत केवळ एकाच दिवशी शंभर लाभार्थींना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले होते. पुन्हा ही संख्या घटली आहे. लसीचे परिणाम नेमके काय हे समोर आल्यानंतरच, शिवाय अनेकांच्या मनात असलेली भीती या बाबी सुरुवातीला लसीकरण अगदी कमी झाल्याला कारणीभूत ठरल्या. मात्र, रिॲक्शन नसल्याने किंवा अगदी सौम्य रिॲक्शन असल्याने आता हळूहळू कर्मचारी समोर येत आहेत, असे यंत्रणेकडून सांगितले जात आहे.

दुसरा साठा प्राप्त

१ जिल्ह्याला १४ जानेवारी रोजी कोविशिल्ड या लसीचे २४ हजार ३२० डोस हे सुरुवातीला प्राप्त झाले होते. कमी डोस असल्याने यात लसीकरणासाठी केवळ सात केंद्रे ठरविण्यात आली होती. नंतर २३ जानेवारी रोजी १९ हजार डोसचा दुसरा साठा प्राप्त झाला.

२ एकत्रित ४३ हजारांवर डोस प्राप्त झाले आहेत. यात दहा टक्के डोस वाया जातील, असे गृहीत धरून तसेच दररोज होणाऱ्या लसीकरणात काही डोस वाया जात असल्याने त्यानुसार आता तेरा केंद्रांवर नियोजन करण्यात येत आहे.

३ ज्या केंद्रांवर लसीकरण कमी प्रमाणात होत आहे, ती केंद्रे बदलून अन्य केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

कोट

जिल्ह्याला आता पुरेसे डोस प्राप्त झाले आहेत. आणखी डोस मिळणार आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला टप्पा हा १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. जिल्ह्याची सध्याची परिस्थिती बघता २० हजारांपैकी १४ ते १५ आरोग्य कर्मचारी लस घेतील असे चित्र आहे. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

जीएमसी जळगाव ५६८

जामनेर ५१३

चोपडा ५८६

मुक्ताईनगर १७७

चाळीसगाव ५२२

पारोळा ३७३

भुसावळ ४९८

अमळनेर २२२

पाचोरा १०७

रावेर १३५

यावल १७५

गाजरे हॉस्पिटल ७६५

गोल्डसिटी हॉस्पिटल ३१२

कुठे किती लसीकरण झाले?

लातूर (५३५७)

अमरावती (५२४७)

जळगाव (४९५३)

बीड (४८५६)

पालघर (४८२७)

Web Title: Jalgaon district ranks 15th in corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.