जळगाव जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पांची पाणीपट्टी थकबाकी १०८ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:48 PM2019-11-22T12:48:30+5:302019-11-22T12:49:00+5:30

सर्वाधिक बिगर सिंचन थकबाकी ‘हतनूर’ची

Jalgaon district has three major projects with waterlog outstanding at Rs 3 crore | जळगाव जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पांची पाणीपट्टी थकबाकी १०८ कोटींवर

जळगाव जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पांची पाणीपट्टी थकबाकी १०८ कोटींवर

Next

जळगाव : जिल्ह्यातील हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पांची बिगर सिंचन पाणीवापर संस्थांची पाणीपट्टीची थकबाकी तब्बल १०८ कोटींवर पोहोचली आहे. त्यात बहुतांश मनपा, नपा व ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा योजनाच असल्याने जलसंपदा विभागही हतबल असल्याचे चित्र आहे. हतनूर प्रकल्पाची सर्वाधिक ९३ कोटी ११ लाखांची थकबाकी आहे. त्तर वाघूरची ९ कोटी ८१ लाख व गिरणाची ५ कोटी ६० लाखांची थकबाकी आहे.
जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प, १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पांवरून मोठ्या प्रमाणात बिगरसिंचनासाठी पाणीवापर संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यात उद्योगांचाही समावेश आहे.
मात्र सिंचन पाणीपट्टीबरोबरच ही बिगर सिंचनाची पाणीपट्टीही मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. त्यामुळे या तीन प्रकल्पांचे उत्पन्नाचे स्त्रोतच अडचणीत आले आहेत.
हतनूरची ९३ कोटी ११ लाख थकबाकी
तापी नदीवरील हतनूर धरणावरून तब्बल ५३ पाणीवापर संस्था व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना बिगर सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याच्या पाणीपट्टीची वसुली मात्र नियमित होत नसल्याचे चित्र आहे. बिगरसिंचन पाणीपट्टीची ही थकबाकी आॅक्टोबर २०१९ अखेर ९३ कोटी ११ लाख ६६ हजारांवर पोहोचली आहे. त्यात औद्योगिक थकबाकी सर्वाधिक ९१ कोटी १६ लाख इतकी आहे. त्यात दीपनगर औष्णिक वीज केंद्राची दोन्ही टप्प्यांची मिळून थकबाकी ५६ कोटी ७९ लाख आहे. मध्य रेल्वे भुसावळ १६ कोटी ३१ लाख, विंध्या पेपर मिल दुसखेडा ३कोटी ५० लाख, एमआयडीसी जळगाव १२ कोटी ९ लाख, चोपडा सहकारी साखर कारखाना १ कोटी ३० लाख ७७ हजार यांच्यासह ५३ संस्थांचा समावेश आहे. १२ नगरपालिकांच्या योजनांकडे १ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे. तर ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकडे एकूण ६० लाख ५७ हजारांची थकबाकी आहे.
वाघूरची ९ कोटी थकबाकी
वाघूर प्रकल्पातर्फे दर दोन महिन्यांनी पाणीपट्टीचे बिल दिले जाते. त्यानुसार बिगरसिंचन पाणीपट्टीची आॅगस्टअखेर ९ कोटी ८१ हजार थकबाकी होती. त्यात जळगाव महापालिका ८ कोटी ६६ लाख ९८ हजार १३० रूपये, नेरी व ७ गाव पाणी योजनेची १९ लाख ४५ हजार २९, जामनेर नगरपरिषद १२ लाख ७० हजार १६७, नशिराबाद ग्रा.पं. १ लाख ६७ हजार ७११ रूपये थकबाकी आहे. केवळ सुप्रीम कंपनीकडून वेळेवर पाणीपट्टी भरली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गिरणाची ५ कोटी ६० लाख थकबाकी
उपलब्ध आकडेवारीनुसार गिरणा प्रकल्पाची सप्टेंबर अखेरपर्यंतची बिगरसिंचनाची थकबाकी ५ कोटी ६० लाख ५५ हजारांची थकबाकी आहे. आॅक्टोबरअखेरची आकडेवारी उपलब्ध झालेली नसल्याचे संबंधीतांनी सांगितले. त्यात मालेगाव मनपाची १ कोटी ४७ लाख ४५ हजार ६५३, एमआयडीसी धुळे १ कोटी १३ लाख १२ हजार६९९, जैन उद्योग समुह जळगाव (नागदुली पाटशाखा) १ कोटी ३६ लाख २६ हजार ६८१, बेलगंगा सहकारी साखर कारखाना (अंबाजी गृप, चाळीसगाव) १ कोटी २८ लाख ५८ हजार ६५२, एरंडोल नगरपालिका ८ लाख ४५ हजार ८९९, भडगाव नगरपालिका ६ लाख ९९ हजार ९४२, पाचोरा नगरपालिका १० लाख ४३ हजार ७६०, चाळीसगाव नगरपालिका ७ लाख ५६ हजार १३१, पारोळा नगरपालिकेची १ लाख ६६ हजार २५१ रूपये थकबाकी आहे.

Web Title: Jalgaon district has three major projects with waterlog outstanding at Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव