जळगाव जिल्ह्यात लोक न्यायालयात साडे तीन हजार खटले निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 22:59 IST2017-12-09T22:54:39+5:302017-12-09T22:59:30+5:30
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्टÑीय लोक न्यायालयात शनिवारी ३ हजार ७७३ खटले निकाली काढण्यात आले. त्यात ९ कोटी ६ लाख ४० हजार ६७२ रुपयांची तडजोड झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालयात या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत लोकअदालतचे कामकाज सुरु होते.

जळगाव जिल्ह्यात लोक न्यायालयात साडे तीन हजार खटले निकाली
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,९: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या लोक न्यायालयात शनिवारी ३ हजार ७७३ खटले निकाली काढण्यात आले. त्यात ९ कोटी ६ लाख ४० हजार ६७२ रुपयांची तडजोड झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालयात या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत लोकअदालतचे कामकाज सुरु होते.
या न्यायालयासाठी १५ पॅनल नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, दोन सदस्य वकील होते. जळगाव तालुका व मुख्यालयातील दिवाणी व फौजदारी खटले, कलम १३८ एन.आय अॅक्ट प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, दरखास्ती, बॅँक, विमा कंपन्या, विद्युत कंपनी, भूसंपादन, न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरणे, दावे तसेच औद्योगिक न्यायालय, कामगार, सहकार न्यायालयाचीही प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.
पक्षकार, त्यांचे नातेवाईक वकील यांच्यामुळे न्यायालयाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. ही गर्दी पाहता न्यायालयात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सरकारला व्याजात १५ टक्के सूट
भूसंपादनाच्या प्रकरणात शेतक-यांनी दरखास्तीमध्ये दोन वर्षाचे १५ टक्के वार्षिक दराने व्याजाची सुट सरकारला दिलेली आहे. याशिवाय प्रलंबित भूसंपादन प्रकरणात तडजोड केल्यामुळे एक वर्षाची व्याजाची सुटही सरकारला मिळालेली आहे. अशा प्रकरणात ३ कोटी ५० लाख ८७ हजार १६५ रकमेची तडजोड झालेली आहे. यात शासनाने आव्हान न देता येणारा निकाल हा पक्षकारासाठी फायद्याचा ठरला आहे. भूसंपादन प्रकरणात अधिकारी व वकीलांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने ४१३ पेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहेत.
या लोकन्यायालयाला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.आर.आर.महाजन, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, प्रांताधिकारी जलज शर्मा उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी म्हणून उपअधीक्षक सचिन सांगळे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे उपस्थित होते.