शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : तुला जीवंत सोडणार नाही म्हणत तरुणाच्या डोक्यात घातले लोखंडी वजन माप

By सुनील पाटील | Updated: July 6, 2024 15:22 IST

दाणाबाजारातील घटना; दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

जळगाव : एका वाहनाचा दरवाजा दुसऱ्या वाहनाच्या बॉडीत अडकल्याने झालेल्या नुकसानीच्या कारणावरुन दिलीप अर्जुन चौधरी (वय ३१, रा.धरणगाव) या तरुणाला फळ विक्रेत्याजवळील लोखंडी वजन माप घेऊन डोक्यात घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दाणाबाजारात घडली. याप्रकरणी श्रीकांत प्रकाश मोरेकर (वय ३४, रा.हुडको, शिवाजी नगर) व वासुदेव पितांबर माळी (वय ५४, रा.धरणगाव) या दोघांविरुध्द शुक्रवारी सायंकाळी शनी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार, दिलीप चौधरी व त्याचा भाऊ ४ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मालवाहू टेम्पो घेऊन दाणाबाजारातून बाहेर निघत असताना श्रीकांत मोरेकर याच्या मालवाहू वाहनाचा दरवाजा चौधरीच्या वाहनात अडकला. त्यात नुकसान झाल्याने श्रीकांत याने दिलीप याच्याकडे नुकसान भरपाई मागितली. ती देण्यास नकार दिल्याने वासुदेव माळी याने शिवीगाळ केली. दिलीप तेथून निघून जात असताना श्रीकांत याने टेम्पो समोर दुचाकी आडवी लावून ‘तुला आज जीवंत सोडणार नाही’ असे म्हणत दिलीप याला वाहनाच्या खाली ओढून लाथाबुक्यांनी मारहाण केली. शेजारीच असलेल्या फळ विक्रेत्याजवळी लोखंडी वजनकाटा घेऊन डोक्यात घातला. यात दिलीप गंभीर जखमी झाला असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिलीप याच्या फिर्यादीवरुन भा.न्या.सं.कलम १०९, १२६ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (३), ३ (५) नुसार गुन्हा दाखल झाला असून श्रीकांत व माळी दोघांना अटक करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी