जळगावात संपकरी चालकाची प्रकृती खालावली, खाजगी रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 13:17 IST2017-10-19T13:10:36+5:302017-10-19T13:17:06+5:30
सलग तिस:या दिवशीही एस़टी़कर्मचा:याचा संप कायम

जळगावात संपकरी चालकाची प्रकृती खालावली, खाजगी रुग्णालयात दाखल
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19 - एस़टी़कामगारांच्या सलग बेमुदत संपाचा तिसरा असून शासन व एस़टी़महामंडळाच्या वादात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आह़े दरम्यान, जळगाव आगाराचे संपकरी चालक देविदास सुकलाल सपकाळे (वय 52, रा. दादावाडी, जळगाव) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गेल्या तीन दिवसांपासून जळगाव आगारात ठाण मांडून होते.
प्रशासनाने खाजगी वाहने अधिग्रहीत केलेल्या वाहनांकडून प्रवाशांची लूट सुरु आह़े दुसरीकडे स्कूलबसेस व इतर वाहनधारकांमध्ये भीती तसेच संपात सहभागी होणा:या कर्मचा:यांमधील भीती यात पोलीस कमी पडत असल्याचे चित्र आह़े लक्ष्मीपूजनानंतर दुस:या पाडवा, भाऊबीज आह़े त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची गर्दी होणार आह़े त्यापूर्वी प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आह़े अशी सूर उमटत आह़े दरम्यान अनेक ठिकाणी संप मिटल्याच्या सोशल मीडियावर अफवांना ऊत आला असल्याने प्रवासी संभ्रमात आहेत़