शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यापा-याच्या डोक्यात पिस्तुल तर डोळ्यात मिरची स्प्रे मारुन कार लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:38 IST

मेहरुण तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नरेंद्र बहादुरसिंग ठाकूर (वय ५९, रा.आदर्श नगर, जळगाव) या व्यापाºयाच्या डोक्यात एकाने पिस्तुल मारुन तर दुस-याने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन सात लाख रुपये किमतीची नवी कार व खिशातील दोन हजार रुपये लांबविल्याची थरारक घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता घडली. या घटनेत ठाकूर जखमी झाले असून त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे मेहरुण तलावाजवळ पहाटेचा थरार  दुचाकीवरुन आले हल्लेखोरपोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगावदि,१८  : मेहरुण तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नरेंद्र बहादुरसिंग ठाकूर (वय ५९, रा.आदर्श नगर, जळगाव) या व्यापाºयाच्या डोक्यात एकाने पिस्तुल मारुन तर दुस-याने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन सात लाख रुपये किमतीची नवी कार व खिशातील दोन हजार रुपये लांबविल्याची थरारक घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता घडली. या घटनेत ठाकूर जखमी झाले असून त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी की,  नरेंद्र ठाकूर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गुजराथी गल्लीत उषा ट्रान्सपोर्ट नावाचे ट्रान्सपोर्ट आहे. सुभाष झिपरु तोतला व जगन्नाथ काळू महाजन या दोन मित्रांसह ठाकूर दररोज सकाळी सहा वाजता स्वतंत्र कार घेऊन मेहरुण तलावाकडे मॉर्निंक वॉकला जातात. सोमवारीही तिघं जण नेहमी प्रमाणे सकाळी सहा वाजता तलावाकडे गेले. कृष्णा लॉनजवळ तोतला व काळे यांनी कार पार्कींग केली. त्यानंतर ठाकूर यांनीही त्यांची कार (एम.एच.१९ बी. यु. ३७६५)पार्कींग केली. काळे व तोतला २० ते २५ फूट पुढे गेल्यानंतर तोंडाला मास्क बांधलेले व काळे कपडे परिधान केलेले दुचाकीवरुन दोन जण आले. दुचाकीवरुन उतरताच ‘गाडी की चावी दे’ असे म्हणत एकाने पिस्तुल काढून त्याची मागची बाजू डोक्यात मारली तर दुसºयाने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन खिशातील दोन हजार रुपये काढून पोबारा केला.एकाने दुचाकी तर दुसºयाने कार नेलीया घटनेत काही मिनिटातच हा सारा खेळ झाला. दोघांपैकी एकाने त्याच्याजवळील दुचाकी (क्र.एम.एच.१९-७७११) नेली तर दुसºयाने कारचा ताबा घेतला. कृष्णा लॉन्सच्या दिशेने ते शिरसोली रस्त्यावर लागले. पाचो-याच्या दिशेने गेले की शहराकडे हे समजू शकले नाही. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा