शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जळगाव शहरात गणरायाचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांची रिक्षा उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:56 IST

 अंगारकी चतुर्थीनिमित्त तरसोद येथील गणपतीचे दर्शन घेऊन जळगाव शहराकडे येत असलेल्या भाविकांच्या रिक्षाला अपघात होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नशिराबादकडे जाणाºया प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाने कट मारल्यामुळे रिक्षा पलटी झाली. या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाने दोन दुचाकींनाही कट मारला. 

ठळक मुद्दे नऊ जण जखमी  महामार्गावर मन्यारखेडा फाट्याजवळील घटना जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३ :  अंगारकी चतुर्थीनिमित्त तरसोद येथील गणपतीचे दर्शन घेऊन जळगाव शहराकडे येत असलेल्या भाविकांच्या रिक्षाला अपघात होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नशिराबादकडे जाणा-या प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाने कट मारल्यामुळे रिक्षा पलटी झाली. या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाने दोन दुचाकींनाही कट मारला. 

असा झाला विचित्र अपघातयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणा-या प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनाने (क्र.एम.एच.१९ बी.एम.६८६८) मंगळवारी दुपारी मन्यारखेडा फाट्याजवळ दुचाकीला (क्र.एम.एच.१९ सी.ई.५७३५) धडक दिली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने तरसोदकडून गणेशभक्तांना घेऊन येणा-या रिक्षाला (क्र.एम.एच.१९ जे.६४९९) या वाहनाने जोरदार कट मारला. त्यात रिक्षा पलटी झाली. 

जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचाररिक्षा चालकासह ९ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तरसोदचे सरपंच पंकज पाटील व सहकाºयांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, राजेंद्र साळुंखे, किरण बाविस्कर, राजेंद्र कोळी, चेतन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली.

असे आहेत जखमीप्रभाकर मुरलीधर थोरात (रा.तरसोद, रिक्षा चालक), सुमित्रा राजेंद्र मिस्तरी (वाघ नगर, जळगाव), हिरामण साहेबराव चौधरी, संगीता हिरामण चौधरी (गहुखेडा, ता.रावेर), भारती सुरेश राजपूत (वाघ नगर, जळगाव), कविता शरद पाटील (रा.पळासखेडा, ता.पारोळा), दुस-या वाहनाचा चालक रतन श्रावण चौधरी (रा.जळगाव), दुचाकीवरील मोहम्मद अजहर शेख हमीद, उमेद मोहम्मद रिझवान (भुसावळ) आदी जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा