शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पहिल्याच पावसात जळगाव शहर ‘जल’मय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 1:15 PM

एका तासात धो, धो धुतले

जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पाहिली जात असलेल्या मेघराजाने शहर परिसरात तब्बल एक तास हजेरी लावत संपूर्ण शहर जलमय करून टाकले. मात्र या दमदार हजेरीने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते.मृग नक्षत्राला यंदा ८ जूनपासून प्रारंभ झाला. यंदा दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या जनतेला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. या आठवड्यात एक, दोन वेळा पाऊस झाला, मात्र तो समाधानकारक नव्हता. उलट या पावसापाठोपाठ उकाड्याने जनता हैराण झाली होती. संपूर्ण मृग नक्षत्र पावसाच्या प्रतीक्षेत गेले. गेल्या आठवड्यात शनिवारी २२ पासून आर्द्रता नक्षत्रास सुरूवात झाली. या नक्षत्रात पाऊस पडेल याकडे सर्वच आशेने डोळे लावून होते.नाल्याचे पाणी रस्त्यावरश्रीकृष्ण कॉलनी, उदय कॉलनी भागातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरच वाहने लावून पाणी कमी होण्याची वाट पाहिली. तब्बल ७.३० पर्यंत या भागात ही परिस्थिती होती. या भागातून जाणारा नाल्याची सफाई करण्यात यावी, अशी तक्रार आपण आपले सरकार पोर्टलवर केली होती, अशी माहिती या भागातील रहिवासी संजय भोकरडोळे यांनी दिली.बेंडाळे चौकात झाड पडलेपुष्पलता बेंडाळे चौकातही एक झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जेसीबीने हे झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.बजरंग बोगद्यावरील वाहतूक थांबविलीबजरंग बोगदा अक्षरश: पाण्याखाली गेल्यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागून पिंप्राळा रेल्वेगेटकडे अनेकांनी आपला मोर्चा वळवून तेथून वाहने नेली. मात्र या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर व अन्य १२ वाहतूक कर्मचाऱ्यांनी तब्बल एक तास या भागात थांबून वाहतूक सुरळीत केली.जनमानस सुखावलेसायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान सुरू झालेला हा पाऊस ६.३० पर्यंत म्हणजे तब्बल एक तास सुरू होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे बराच दिलास मिळाला, पहिल्याच दमदार हजेरीने जनमानस सुखावले. दरम्यान, नालेसफाई न झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.पावसाची दमदार हजेरीबुधवारी सकाळपासून प्रचंड उकाडा व उन्हाचा चटका जाणवत होता. अंगावरून घामाच्या धारा वाहत असल्यामुळे जनमानस अस्वस्थ असताना सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जोरदार वादळाला सुरूवात झाली. पावसाच्या वातावरणामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. वादळी वाºयामुळे शनिपेठ, सुभाष चौक भागात बाजारातील व्यावसायिकांनी लावलेले प्लॅस्टिक कागद, छत्र्या उडून गेल्या. वादळा पाठोपाठ जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पाहता, पहाता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. बाजारापेठेत आलेल्या नागरिकांची यामुळे पळापळ सुरू झाल्याचे दृश्य दिसून आले.वीज पुरवठा खंडीत५.३० वाजता वादळ व त्या पाठोपाठ पाऊस सुरू झाल्याने वीज पुरवठाही खंडीत झाला होता. बºयाच भागात आठ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद होता तर काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांच्या तक्रारी सुरू होत्या.बजरंग बोगदा परिसर जलमयया पावसामुळे जुना व नवा बजरंग बोगदा पाण्याने भरल्याचे दृश्य दिसून आले. या भागात तब्बल दीड तास वाहने खाळंबली होती. परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर पुलावर रेल्वेही थांबून होती. या पुलातील पाण्यातून अनेकांनी वाहने टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाहने मध्येच बंद पडली.खडसेंच्या घराजवळ वृक्ष उन्मळलाशिवराम नगर भागात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर एक मोठा वृक्ष उन्मळून पडला होता, मात्र यात कुठलेही नुकसान झाले नाही. तात्काळ जेसीबी पाठवून हे झाड रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.विविध भागात तळे साचलेया पावसामुळे काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर, कोर्ट चौक, नवीपेठेतील बॅँक स्ट्रिट, बालगंधर्व खुले नाट्यगृह परिसर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसर, पुष्पलता बेंडाळे चौकापासून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता संपूर्ण जलमय झाला होता. गुडघ्यापर्यंत पाणी बºयाच ठिकाणी साचले होते. यात काही जाणारी-येणारी वाहनेही बंद पडली. एस.एम.आय.टी. कॉलेज जवळील नाला पावसामुळे दुथडी भरून वाहताना दिसत होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव