जळगाव - जळगाव शहर मतदारसंघाची जागा शिवसेना की भाजपाला सुटते याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती. मंगळवारी जाहीर झालेल्या भाजपाच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहर अखेर भाजपाच्या खात्यात गेल्याने उत्सुकता संपली आहे. शिवसेनेकडून जळगाव शहर मतदार संघासाठी दावा केला जात होता. आता आमदार सुरेश भोळे हे ३ रोजी अर्ज भरणार आहेत.
उत्सुकता संपली जळगाव शहर अखेर भाजपाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:38 IST