शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जळगाव शहरात वाळूच्या डंपरन वृद्धाला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:43 IST

 शिवाजी नगरात जिल्हा दूध संघानजीक वाळूच्या डंपरच्या धडकेने केटरींग कारागीराचा हात निकामी झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच सोमवारी पुन्हा वाळूच्या डंपरने गोपाळपु-यातील एका वृद्धाला उडविल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. 

ठळक मुद्दे  मनपाच्या चौबे शाळेजवळील घटना  चालकास मारहाण, डंपरच्या काचा फोडल्या  सलग दुसरी घटना

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७ :  शिवाजी नगरात जिल्हा दूध संघानजीक वाळूच्या डंपरच्या धडकेने केटरींग कारागीराचा हात निकामी झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच सोमवारी पुन्हा वाळूच्या डंपरने गोपाळपु-यातील एका वृद्धाला उडविल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. रामदास झिपा भील (वय ७० रा.गोपाळपुरा, जळगाव) यांच्या पायावरुन डंपर गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करीत चालकाला मारहाण केली.सकाळी दहा वाजता मनपाच्याचौबे शाळेजवळहीघटनाघडली. पायावरुन गेले डंपरयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामदास भील हे चौबे शाळेकडून बळीराम पेठकडे रस्ता ओलांडत असताना खेडी येथून वाळू घेऊन येत असलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९ बी.जी.२३१३) त्यांना धडक दिली. त्यात ते जमिनीवर कोसळले व त्याच वेळी डंपरचे पुढचे टायर रामदास भील यांच्या पायावरुन गेले. जागेवरच रक्तबंबाळ झालेल्या रामदास भील यांना नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनी पेठ पोलिसांनी डंपर ताब्यात घेवून ते जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात लावले तर चालक स्वप्नील धनगर हा नंतर पोलीस ठाण्यात दाखल झाला. 

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव