शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात पोलीस कारवाईच्या भीतीने सुसाट दुचाकी आदळली दुभाजकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:57 IST

पोलीस कारवाई करतील या भीतीने रस्ता चुकविण्याच्या नादात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दोन सख्खे भाऊ व त्यांचा मित्र असे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता काव्यरत्नावली चौकात घडली. 

ठळक मुद्दे काव्यरत्नावली चौकात अपघात  दोन भाऊ व एक मित्र जखमी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : पोलीस कारवाई करतील या भीतीने रस्ता चुकविण्याच्या नादात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दोन सख्खे भाऊ व त्यांचा मित्र असे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता काव्यरत्नावली चौकात घडली. परपत पुखराज टाक (वय १७ रा.निमखेडी, ता.जळगाव), मिहीर संतोष तायडे (वय १७) व जतीन संतोष तायडे (वय १५)  दोन्ही रा.पुष्पांजली पार्क, शिवाजी नगर, जळगाव असे जखमींची नावे आहेत. टाक याला जिल्हा रुग्णालयात तर मिहीर व जतीन या दोन्ही भावांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नरपत, मिहीर व जतीन असे तिघं जण एकाच दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.सी.५५९६) मेहरुण उद्यानाजवळील जलतरण तलावात स्वीमिंगसाठी गेले होते. तेथून परत घरी जात असताना काव्यरत्नावली चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. वाहन चालविण्याचा परवाना नाही, शिवाय आपण एकाच दुचाकीवर तीन जण असल्याने पोलीस अडवून कारवाई करतील अशी भीती या तिघांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे सुसाट वेगाने आलेल्या या तिघांची दुचाकी रस्ता चुकविताना भाऊंच्या उद्यानासमोरील दुभाजकावर आदळली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारीकाव्यरत्नावली चौकात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होत असल्याने प्रशासनाच्यावतीने तेथे तयारी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी पोलिसांचीही रंगीत तालिम सुरु असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची मोठी गर्दी या ठिकाणी होती.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा