जळगाव शहरात चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रक आदळला कारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:16 IST2018-02-10T23:14:29+5:302018-02-10T23:16:35+5:30
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सिग्नलवर थांबलेल्या कारवर ट्रक आदळल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात घडली. यावेळी कारला ट्रकने काही फुटापर्यंत फरफटत नेले होते.

जळगाव शहरात चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रक आदळला कारवर
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१० : चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सिग्नलवर थांबलेल्या कारवर ट्रक आदळल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात घडली. यावेळी कारला ट्रकने काही फुटापर्यंत फरफटत नेले होते.
अपघातग्रस्त ट्रक हा कोलकाता येथून मुंबईच्या दिशेने (ट्रक क्र. सी.जी. ०४ जे.डी. ९१७१) जात होता. तर कार (एम.एच.१९ ए.ई.२४१२ )महाबळ कॉलनीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होती. दरम्यान, आकाशवाणी चौकात धुळ्याकडे जाणारा सिग्नल बंद झाला. परंतु भुसावळकडून येत असलेल्या चालकाकडून ब्रेक न लागल्याने ट्रक बंद सिग्नलमध्ये घुसून महाबळकडून महामार्ग ओलांडत असलेल्या कारला धडक देत तिला फरफटत नेली. या अपघातात कारच्या उजव्या बाजूचे पत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान,उपनिरीक्षक भागवत पाटील,गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत चालकासह ट्रक ताब्यात घेतला.