शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात बस चालकाला कॅबिनमधून काढून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:51 IST

गतीरोधकाजवळ वेग कमी केल्याने मागे चालणारी कार एस.टी. बसवर धडकल्याने संतापलेल्या कारमधील तिघांनी बस चालकाला कॅबिनमधून बाहेर काढून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याजवळ घडली. याप्रकरणी कारमधील तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे शिव कॉलनीजवळील घटना  तिघांविरुध्द गुन्हा दाखल बसवर आदळली कार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३ : गतीरोधकाजवळ वेग कमी केल्याने मागे चालणारी कार एस.टी. बसवर धडकल्याने संतापलेल्या कारमधील तिघांनी बस चालकाला कॅबिनमधून बाहेर काढून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याजवळ घडली. याप्रकरणी कारमधील तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संतोष भिका बाविस्कर (रा.निवृत्ती नगर, जळगाव) हे जळगाव आगारात चालक म्हणून नोकरीला आहेत. मंगळवारी वाहक संगीता पाचपोळ यांच्यासोबत जुन्या बसस्थानकातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रवाशी असलेली एस.टी.बस (एम.एच. १४ बी.टी. १३२९) घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्गावरुन शिवकॉलनीजवळ गतीरोधकाजवळ पुढे चालणारी वाहने थांबलेली होती, त्यामुळे बाविस्कर यांनी बस थांबविली. याच बसमागून येत असलेली कार (क्रमांक एम.एच. १९ सी.एच.५२७७)  बसवर आदळली. त्यात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.  प्रदीप अशोक मते, अशोक नामदेव मते व सुभाष नामदेव मते (रा.खोटेनगर, जळगाव) या तिघांनी बस चालकाशी वाद घातला. त्यानंतर थोड्यावेळाने काही जणांना बोलावून घेत बाविस्कर यांना मारहाण करण्यात आली.सायंकाळपर्यंत तडजोडीचे प्रयत्नया घटनेनंतर बस चालकाने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथे तक्रार देऊ नये म्हणून अनेक जणांच्या माध्यमातून चालकावर दबाव टाकला जात होता तर कधी विनंती केली जात होती. शेवटी सायंकाळी कारमधील तिघांविरुध्द मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा