शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

विसर्जनासाठी जळगावला प्रथमच मागविला ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:41 IST

गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे. दरम्यान, शहरातील विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी १ हजार ५२९ मंडळाकडून जिल्ह्यात ‘श्री’ चे विसर्जन केले जाणार आहे. त्यात १०५ ‘एक गाव एक गणपती’ चा समावेश आहे.

ठळक मुद्देविसर्जन मार्गावर सीसीटीव्हीची नजर अखेरच्या दिवशी १५२९ मंडळाकडून विसर्जन
जळगाव : गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे. दरम्यान, शहरातील विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी १ हजार ५२९ मंडळाकडून जिल्ह्यात ‘श्री’ चे विसर्जन केले जाणार आहे. त्यात १०५ ‘एक गाव एक गणपती’ चा समावेश आहे. यंदा जिल्ह्यात २ हजार ३२१ मंडळाकडून ‘श्री’ची स्थापना झाली असून १४१ गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १ हजार ७०२ ठिकाणी सार्वजनिक तर ४७८ ठिकाणी खासगी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कुठेही अनुसचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमच विसर्जनाला ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.मुंबई येथून मागविला फोर्सगणेशोत्सव शांततेत पार पडावा, या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई येथून रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स मागविण्यात आला असून त्यात १२० सशस्त्र कर्मचारी आहेत. त्याशिवाय पोलीस प्रशिक्षण केंद्रातील २५ उपनिरीक्षक जालना व धुळे येथून स्वतंत्र २०० जणांचे रिक्रुड (पथक) मागविण्यात आले आहे. दरम्यान, विसर्जन मार्गावर ५२ ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.असे आहेत अखेरच्या दिवशी विसर्जनाचे मंडळएकुण मंडळ : १५२९सार्वजनिक :११५४खासगी : ३७५एक गाव एक गणपती : १०५असा राहिल बंदोबस्तपोलीस अधीक्षक : १अपर पोलीस अधीक्षक : २उपअधीक्षक : १०पोलीस निरीक्षक : ३२वायरलेस निरीक्षक : २सहायक /उपनिरीक्षक : ९०परिविक्षाधीन उपनिरीक्षक : २०सीआयडी निरीक्षक (पुणे) ५नवप्रविष्ठ शिपाई : २००कर्मचारी : २६००आरसीपी प्लाटून : ८ (एका प्लाटूनमध्ये २९ कर्मचारी)एसआरपी कंपनी : १ (१२० कर्मचारी)होमगार्ड : १८००एसआरपीएफ कंपनी : १ (अमरावती)आरसीपी प्लाटून : ८स्ट्रायकिंग फोर्स : १६ प्लाटूनक्युआरटी पथक : १ रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स : १२० कर्मचारी
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव