आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ - दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आय.सी.ए.आय.च्या ६८ व्या वार्षिक सोहळ्यात जळगाव सी.ए.शाखेला २०१७-१८ च्या कामगिरीबद्दल मध्यमवर्गातील शाखेचा राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.केंद्रीय कापोर्रेट आणि कायदा व न्याय राज्यमंत्री पी.पी.चौधरी यांच्या हस्ते अध्यक्षा सी.ए.पल्लवी मयुर, डॉ.राहुल मयूर, सी.ए.स्मिता बाफना व सी.ए.सागर पटनी यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल आय.सी.ए.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश विकमसे, प्रफुल्ल छाजेड,मंगेश किनारे आदिंसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सी.ए.जळगाव शाखेच्या पहिल्या महिला अध्यक्षा सी.ए.पल्लवी मयुर यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकारणी सदस्य, सी.ए.शाखेचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी २०१७-१८ या वर्षात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने सी.ए. शाखेचे कौतुक होत आहे.
जळगाव सी.ए. शाखेला राष्ट्रीय पुरस्कार, आय.सी.ए.आय.चा ६८वा वार्षिक सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:54 IST
मध्यमवर्गातील शाखेचा राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार
जळगाव सी.ए. शाखेला राष्ट्रीय पुरस्कार, आय.सी.ए.आय.चा ६८वा वार्षिक सोहळा उत्साहात
ठळक मुद्देप्रमाणपत्र व मानचिन्ह प्रदान सी.ए. शाखेचे कौतुक