शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जळगाव झाले जलगाव

By विलास.बारी | Published: August 20, 2017 5:35 PM

८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ; वाघूर धरणात ९३ टक्के तर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त जलसाठा

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के जलसाठागिरणा धरणात ५२ तर हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठाजिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने पोळ्याचा आनंद झाला द्विगुणितरविवारी दुपारी तब्बल अर्धा तास पावसाने जळगावकर चिंब

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२० : जिल्हाभरात पावसाचे सुखद पुनरागमन झाले आहे. शनिवारी  दिवसभर झालेल्या पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त साठा निर्माण झाला आहे. जळगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के तर गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त जलसाठा निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे शुभागमन झाले. शनिवारी झालेल्या भीज पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजाला आनंद झाला आहे.८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीशनिवार १९ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात जळगाव तालुक्यात ८१ मिमी.,  एरंडोल १८१, धरणगाव १४९, मुक्ताईनगर ६७, बोदवड १६९, पाचोरा १९३, चाळीसगाव १३५, भडगाव ८९ मिमी पाऊस झाला.वाघूर धरण ९३ टक्के भरलेजळगाव शहरासह भुसावळला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण दोन दिवस झालेल्या पावसामुळे ९३ टक्के भरले आहे. तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा,जळगाव तालुका, धरणाव तालुक्यातील अनेक पाणी योजना अवलंबून असलेल्या गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे.पोळ्याचा आनंद द्विगुणितगेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाचे पोळ्याच्या मुहूर्तावर आगमण झाल्याने बळीराजा आनंदी झाला आहे. वर्षभर शेतीत राबणाºया बैलाचा पोळ्याच्या निमित्ताने सन्मान आणि पावसाचे पुनरागमन यामुळे बळीराजाचा आनंद द्विगुणित झाला आहे.रविवारी जळगावकर चिंबशनिवारच्या जोरदार पावसानंतर रविवारी सकाळपासून कमी अधिक प्रमाणात जळगावात पाऊस सुरु होता. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरात तब्बल अर्धा तास पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रविवारची सुटी जोरदार पाऊस यामुळे जळगावकरांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाभरात कोठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.- नरविरसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.