जळगाव जिल्ह्यात दुस-या दिवशीही काही ठिकाणी बंद, रस्ता रोको, जळगाव-औरंगाबाद मार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:14 IST2018-01-04T13:04:03+5:302018-01-04T13:14:42+5:30
जळगाव शहरात परिस्थिती पूर्वपदावर

जळगाव जिल्ह्यात दुस-या दिवशीही काही ठिकाणी बंद, रस्ता रोको, जळगाव-औरंगाबाद मार्ग ठप्प
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 04- कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी जळगाव जिल्हा बंद नंतर दुस-या दिवशीही काही ठिकाणी बंद ठेवण्यात येऊन रस्ता रोकोही करण्यात आला. दरम्यान, जळगाव शहरात दुस:या दिवशी परिस्थिती पूर्वपदावर आली. सकाळपासून बाजारपेठ, शाळा, महाविद्यासलय सुरू झाले. तसेच पहाटेपासूनच बसेस्ही सुरू झाल्या.
जामनेर तालुक्यातील पहूर येथे सकाळी 11 वाजेर्पयत बंद पाळण्यात आला. या वेळी करण्यात आलेल्या रस्ता रोकोमुळे औरंगाबाद-जळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तोंडापूर येथेही रस्ता रोको करण्यात आला. शेंदुर्णी येथे बंद पाळण्यात आला.
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे दुपारी 12 वाजेर्पयत बंद पाळण्यात आला. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.