कजर्माफीसाठी जळगावात अर्धनग्न मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 16:44 IST2017-05-31T16:44:52+5:302017-05-31T16:44:52+5:30
भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बुधवारी अर्धनग्न मोर्चाद्वारे

कजर्माफीसाठी जळगावात अर्धनग्न मोर्चा
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 31 - छत्रपती शिवाजी महाराज यांची शेतक:यांसाठी स्वतंत्र नीती होती. त्यांच्या काळात शेतकरी सुखी होता. पण आता अवस्था बिकट आहे. आपणही (जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर) राजे आहात.. आपण आम्हाला छत्रपतींच्या काळासारखे सुखी, आनंदी करा, असे साकडे भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बुधवारी अर्धनग्न मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना घातले.
कजर्माफी मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावेत यासाठी हा अर्धनग्न मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. शर्ट काढून अर्धनग्न स्वरुपातील शेतकरी सहभागी झाले. 11.40 वाजता भर उन्हात हा मोर्चा निघाला. त्यात सहभागी झालेले शेतकरी उत्स्फूर्तपणे चालत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचले.
मोर्चात पाचोरा, जामनेर, एरंडोलसह नंदुरबार, धुळे, नगर येथील काही शेतकरी सहभागी झाले. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील शेतक:यांचा अधिक सहभाग होता. दुपारी शिवतीर्थ मैदानापासून मोर्चा निघाला. उत्पादन शुल्क कार्यालय, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक व पुढे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा गेला.
नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केले. विजयसिंग परदेशी, रवी पवार, नारायण पाटील, शुभम पाटील, दीपक पाटील, ऋतीक पाटील, अण्णा राजपूत, गौरव राजपूत आदी सहभागी झाले.
मागील नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी यांना कजर्माफी व इतर विषयांचे निवेदन दिले. नंतर डिसेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले, पण त्याची दखल घेतली नाही, अशी तक्रार शेतक:यांनी केली. आपण राजे आहात.. आपण आम्हाला सुखी करा, अशी मागणी या शेतक:यांनी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे केली.
आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढे आंदोलन तीव्र करू. ट्रॅक्टरमध्ये माती आणून ती शहरातील मुख्य मार्ग, महामार्गावर टाकू. चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला.